भद्रावतीत आजपासून राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा

By Admin | Updated: March 12, 2016 01:24 IST2016-03-12T01:24:28+5:302016-03-12T01:24:28+5:30

नगर परिषद भद्रावतीच्या वतीने नागपूर विभागस्तरीय नगराध्यक्ष सुवर्ण चषक क्रीडा स्पर्धा तथा राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन...

State-level boxing competition in Bhadravati today | भद्रावतीत आजपासून राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा

भद्रावतीत आजपासून राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा

उद्धव ठाकरे यांची उपस्थिती : ६७ नगर पालिकांचे एक हजार स्पर्धक होणार सहभागी
भद्रावती : नगर परिषद भद्रावतीच्या वतीने नागपूर विभागस्तरीय नगराध्यक्ष सुवर्ण चषक क्रीडा स्पर्धा तथा राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन १२ ते १४ मार्चपर्यंत स्थानिक नीळकंठराव शिंदे महाविद्यालय येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी भद्रावती नगरी सज्ज असून या स्पर्धेत ६७ नगर पालिकांचे एक हजार स्पर्धक सहभागी होणार आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी दुपारी ४ वाजता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत, आ. बाळू धानोरकर, नागपूर विभाग आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, माजी आ. नीळकंठराव शिंदे, महाराष्ट्र बॉक्सींग संघटनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र आॅलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष जय कवळी इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
नगराध्यक्ष चषक स्पर्धेत नागपूर विभागातील ६७ नगर पालिकेचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी असे मिळून एक हजार स्पर्धक सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत व्हॉलीबॉल, क्रिकेट, कबड्डी, बॅडमिंटन, १००, ४०० व ८०० मीटर धावणे इत्यादी क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल चटकी, मुख्याधिकारी विनोद जाधव व न.प.चे पदाधिकारी तथा कर्मचारी परीश्रम घेत आहेत. मैदानावर बॉक्सिंग एरीना तयार करण्यात आला असून कबड्डी व व्हॉलीबॉलचे दोन मैदान तयार करण्यात आली आहेत. एकाच मैदानावर होणाऱ्या या स्पर्धा भद्रावतीकरांसाठी मुख्य आकर्षण राहणार आहेत. न.प.भद्रावतीच्या कार्यालयातील अंतर्गत रचना ही एखाद्या कार्पोरेट कार्यालयाला साजेशी अशी करण्यात आली आहे. तसेच भद्रावती येथील महत्त्वाच्या स्थळांना भेटी देण्यासाठी खेळाडंूसाठी न.प.द्वारे विशेष व्यवस्थाही करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: State-level boxing competition in Bhadravati today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.