ब्रह्मपुरीत राज्यस्तरीय बॉस्केटबॉल स्पर्धा

By Admin | Updated: January 13, 2017 00:36 IST2017-01-13T00:36:27+5:302017-01-13T00:36:27+5:30

संमित्र क्रीडा मंडळ व चंद्रपूर जिल्हा बॉस्केटबॉल असोशिएशनतर्फे १४ ते १७ जानेवारी या कालावधीत राज्यस्तरीय

State-level basketball tournament in Brahmaputra | ब्रह्मपुरीत राज्यस्तरीय बॉस्केटबॉल स्पर्धा

ब्रह्मपुरीत राज्यस्तरीय बॉस्केटबॉल स्पर्धा

अनेक संघांचा समावेश : सन्मित्र मंडळाचे आयोजन
ब्रह्मपुरी : संमित्र क्रीडा मंडळ व चंद्रपूर जिल्हा बॉस्केटबॉल असोशिएशनतर्फे १४ ते १७ जानेवारी या कालावधीत राज्यस्तरीय आमंत्रित बॉस्केटबॉल स्पर्धेचे आयोजन ब्रह्मपुरी येथे करण्यात आल्याची माहिती क्रीडा मंडळाचे सचिव प्रा. प्रकाश आयदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ही स्पर्धा राज्यस्तरावरील असून पुरुष, महिला व बाल अशा तीन गटात ही स्पर्धा घेण्यात येणार आहेत. पुरुष गटात स्व. ओंकारलालजी जाजू स्मृती, महिला गटात स्व. आशा फटींग स्मृती व बाल गटात स्व. योगेश करंडे स्मृती चषक, रोख पारितोषिके व उत्कृष्ट खेळाडूंना विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. या स्पर्धेत पुणे, मुंबई, हिंगोली, नांदेड, कर्नाटक, हैैद्राबाद, बीईजी पुणे, बीड, कोल्हापूर, डीकेएम नागपूर, रेंज पोलीस नागपूर, एचव्हीपीएम अमरावती, वर्धा, सोलापूर, एसएनजी नागपूर, बिलासपूर, उमरेड, नवी लोनावला, मालेगाव इत्यादी संघ भाग घेणार आहेत.
संमित्र क्रीडा मंडळ दरवर्षी बॉस्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करीत असल्याने या क्रीडा मंडळाचे नाव राज्याच्या क्रीडा पटलावर अग्रक्रमाने घेतल्या जाते. संमित्र क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रा. अतुल देशकर, प्रा. उमेशचंद्र मिश्रा, अतुल पाटील गौरशेट्टीवार, प्रा. प्रकाश आयदे, परेश शहादाणी, सी.पी. जेन्स, स्पर्धा सचिव प्रकाश लोखंडे, अनवर शख, पवन जयस्वाल, अभिजीत कोसे, राहुल मेश्राम, प्रतिक जुआरे, सुरज उईके, नफीस खान, निशांत हरडे, राजेश कोहळे, दत्ता येरावार, हेमंत मोटघरे, निशा गायकवाड, शितल टेभूर्णी यांच्या परिश्रमातून ही स्पर्धा संपन्न होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: State-level basketball tournament in Brahmaputra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.