राज्य सरकारने घरगुती वीज देयक माफ करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 05:00 IST2020-06-26T05:00:00+5:302020-06-26T05:00:34+5:30
वीज ग्राहकांना देयक भरताना सवलत द्यावी आणि चुकीचे देयक दुरूस्ती करण्याची मागणी घुग्घुस शहर काँग्रेसने पालकमंत्री विजय वडेडेट्टीवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. मार्च, एप्रिल व मे महिन्याचे मीटर रिडींग न घेता वीज मंडळाने जून महिन्यात बिल पाठविण्यात आले. दोन खोल्या असलेल्या वीज ग्राहकांना पाच बिल आल्याचे निवेदनात नमुद केले आहे.

राज्य सरकारने घरगुती वीज देयक माफ करावे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील विविध संघटनांनी घरगुती वीज देयक माफ करण्याची मागणी वीज अभियंत्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
ब्रह्मपुरी : लॉकडाऊन काळातील थकीत तीन महिन्यांचे वीज बील माफ करण्याची मागणीचे निवेदन माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या नेतृत्वात महावितरण कंपनीचे ब्रम्हपुरी विभागीय कार्यकारी अभियंतांना सादर करण्यात आले. जून महिन्यात महावितरण कंपनीकडून मार्च ते जून महिन्याचे सरासरी देयक देण्यात आले. त्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त रकम भरावी लागणार असल्याचा आरोप ओबीसी आघाडीचे अध्यक्ष प्रा. प्रकाश बगमारे, मनोज भूपाल, अरविंद नंदूरकर, साकेत भानारकर, प्रा.सुयोग बाळबुधे, स्वप्नील अलगदेवे, रेहेमान खान पठाण, अरूण बनकर, अशोक तुडुंलवार, नानाजी गराडे, तनय देशकर, अविनाश मस्के, धीरज पाल, सदाशिव मस्के आदींनी केला आहे.
पालकमंत्र्यांना निवेदन
घुग्घुस : वीज ग्राहकांना देयक भरताना सवलत द्यावी आणि चुकीचे देयक दुरूस्ती करण्याची मागणी घुग्घुस शहर काँग्रेसने पालकमंत्री विजय वडेडेट्टीवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. मार्च, एप्रिल व मे महिन्याचे मीटर रिडींग न घेता वीज मंडळाने जून महिन्यात बिल पाठविण्यात आले. दोन खोल्या असलेल्या वीज ग्राहकांना पाच बिल आल्याचे निवेदनात नमुद केले आहे.
ग्राहक आर्थिक संकटात
गांगलवाडी : ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी परिसरातील ग्राहकांना सरासरी देयक पाठविण्यात आले. त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. या भागातील नागरिकांची उपजीविका शेतीच्या उत्पन्नावर चालते. त्यामुळे दर महिन्याला वीज बिल भरताना ग्राहकांची दमछाक होत असल्याने देयक माफ करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
वीज देयक समजून घेण्यासाठी वेबिनार
चंद्रपूर : महावितरणने ग्राहकांचे अचूक वीज बिल देण्यासाठी पूर्ण खबरदारी घेतली आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी वीज बिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांचे वीज बिल एकत्रित आल्यामुळे घरगुती व वाणिज्यिक वीज ग्राहकांना बिलविषयी झालेला संभ्रम दूर करण्यासाठी वसमस्यांचे निराकरण करण्यासाठी शुक्रवारी सकाळी ११.३० ते दुपारी १.३० वाजता महावितरण चंद्र्रपूर परिमंडलाद्वारे ‘आपले वीज बिल समजून घ्या’ या विषयावर आॅनलाईन वेबिनार संवादाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ग्राहकांना सहभागी होऊन आपल्या समस्या मांडता येणार आहे, अशी माहिती चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांनी दिली आहे.
तहसीलदाराला निवेदन
वढोली : वीज कंपनीने रविवारपासून वीज देयक वाटपाला सुरवात केली आहे. मात्र, तीन महिन्यांचे एकत्रित देयक भरण्यास आर्थिक अडचण होत आहे. त्यामुळे देयक माफ करून नागरिबांना दिलासा देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरज माडूरवार, अरूण वासलवार, पुरुषोत्तम वाघ, नितेश मेश्राम, आकाश चौधरी,दीपक वांढरे,जयेश खरबनकार,निकेश बोरकुटे,गोलू सिडाम आदींनी तहसीलदाराकडे केली आहे.