मनपातील गटबाजीवर प्रदेश काँग्रेसचे लक्ष

By Admin | Updated: October 27, 2014 22:32 IST2014-10-27T22:32:48+5:302014-10-27T22:32:48+5:30

महानगर पालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळ्या चुली मांडून बसलेल्या काँंग्रेसमधील नेत्यांच्या मानसकितेची दखल अखेर प्रदेश काँग्रेस कमेटीने घेतली आहे. मनपा निवडणूक

State Congress focus | मनपातील गटबाजीवर प्रदेश काँग्रेसचे लक्ष

मनपातील गटबाजीवर प्रदेश काँग्रेसचे लक्ष

चंद्रपूर : महानगर पालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळ्या चुली मांडून बसलेल्या काँंग्रेसमधील नेत्यांच्या मानसकितेची दखल अखेर प्रदेश काँग्रेस कमेटीने घेतली आहे. मनपा निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेले माजी मंत्री नितीन राऊत २८ आॅक्टोबरला चंंद्रपुरात येत आहेत.
प्र्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मनपा महापौर निवडणूक निरीक्षक म्हणून नितीन राऊत यांची नियुक्ती केली आहे. सोमवारी दुपारी त्यांनी मनपातील महापौर संगीता अमृतकर, गटनेते संतोष लहामगे, नगरसेवक प्रशांत दानव, आणि महानगर जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष नंदू नागरकर यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून निवडणुकीच्या तयारीसंदर्भात माहिती जाणून घेतली. २८ तारखेला आपण चंद्रपुरात येणार असल्याचे त्यांनी या सर्वांना कळविले असून विश्रामगृहात दुपारी ३ वाजता भेटीसाठी पाचारण केले आहे.
चंद्रपुरातील महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये तीन गट स्पष्ट दिसत आहेत. त्यातील नरेश पुगलिया आणि नंदू नागरकर यांच्या गटाने सामंजस्य दाखवित एकत्र येऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र महापौरांच्या गटाने आपली वेगळी चुल कायम ठेवली असून या निवडणुकीसाठी भाजपाची मदत मागितली आहे. राज्यात ज्या भाजपाने काँग्रेसचा सफाया केला, त्यांच्याकडून महापौरपदाच्या निवडणुकीसाठी या गटाने मदत मागितल्याने प्रदेश काँग्रेस कमेटीनेही याची दखल घेतल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमिवर पक्षाचे निवडणूक निरीक्षक मंगळवारी चंद्रपुरात येत असल्याने ते काय संदेश देतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: State Congress focus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.