स्टेट बँकेतर्फे ताडोबातील सीसीटीव्हीसाठी दहा लाखांचा धनादेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:20 IST2021-07-18T04:20:43+5:302021-07-18T04:20:43+5:30

नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेले ताडोबा व्याघ्र प्रकल्प निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे पर्यटनस्थळ आहे. या प्रकल्पातील जैवविविधतेचा अभ्यास करता यावा तसेच वन्यप्राण्यांच्या संवर्धनात ...

State Bank checks Rs 10 lakh for CCTV in Tadoba | स्टेट बँकेतर्फे ताडोबातील सीसीटीव्हीसाठी दहा लाखांचा धनादेश

स्टेट बँकेतर्फे ताडोबातील सीसीटीव्हीसाठी दहा लाखांचा धनादेश

नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेले ताडोबा व्याघ्र प्रकल्प निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे पर्यटनस्थळ आहे. या प्रकल्पातील जैवविविधतेचा अभ्यास करता यावा तसेच वन्यप्राण्यांच्या संवर्धनात मदत व्हावी, यासाठी १० लाखांचा धनादेश देण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपणही करण्यात आले. कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळावा, यासाठी स्टेट बँक फाउंडेशनच्या माध्यमातून जि.प.ला ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर देण्यात आले. बँकेचे महाप्रबंधक संजय श्रीवास्तव यांच्या हस्ते जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी स्वीकार केला. यावेळी उपमहाप्रबंधक व्ही. चंद्रशेखर, क्षेत्रीय प्रबंधक संजोग भागवतकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गेहलोत आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी बँकेचे व्यवसाय प्रबंधक सौरभ चिवरकर, राजेंद्र झवेरी, सुमेध वैद्य, गुंडावार आदींनी सहकार्य केले.

Web Title: State Bank checks Rs 10 lakh for CCTV in Tadoba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.