सदानंद बोरकर यांना राज्य पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 23:20 IST2019-03-18T23:19:47+5:302019-03-18T23:20:04+5:30
नाशिक येथील सामाजिक कलावंत विचारमंच संस्था व कमल फिल्म प्रॉडक्शनच्या संयुक्त विद्यमाने लोककवी वामनदादा कर्डक, कवी वसंत बापट, शाहीर अमर शेख, दादासाहेब फाळके जयंती व कवियत्री बहिणाबाई चौधरी स्मृतिदिनानिमित्त नवरगाव येथील नाट्यकलावंत प्रा. सदानंद बोरकर यांची राज्य कलावंत पुरस्काराकरिता निवड करण्यात आली.

सदानंद बोरकर यांना राज्य पुरस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नाशिक येथील सामाजिक कलावंत विचारमंच संस्था व कमल फिल्म प्रॉडक्शनच्या संयुक्त विद्यमाने लोककवी वामनदादा कर्डक, कवी वसंत बापट, शाहीर अमर शेख, दादासाहेब फाळके जयंती व कवियत्री बहिणाबाई चौधरी स्मृतिदिनानिमित्त नवरगाव येथील नाट्यकलावंत प्रा. सदानंद बोरकर यांची राज्य कलावंत पुरस्काराकरिता निवड करण्यात आली.
हैद्राबाद येथील चित्रपट दिग्दर्शक सत्यनारायण जाधव यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली. प्रा. बोरकर हे सामाजिक विषयांचे नाट्यकर्मी म्हणून ओळखल्या जातात. नाट्य कलेतून विविध ज्वलंत प्रश्न समाजासमोर मांडण्यात त्यांची हातोटी आहे. झाडीपट्टीत नवीन कलावंत घडविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. ‘माझं कुंकू मीच पुसलं’ हे नाटक देश पातळीवर गाजले. येत्या ३१ मार्चला नाशिक येथील आयएमए सभागृहात दुपारी १२ वाजता हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.