बँक एजंटांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:01 IST2020-04-14T05:00:00+5:302020-04-14T05:01:19+5:30
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे सर्व व्यवसाय बंद आहेत. अत्यावश्यक सेवा केवळ सुरू आहेत. यामध्ये बँका, पतसंस्था, सोसायटीचा समावेश आहे. असे असले तरी येथील बँकेच्या एजंटांना मात्र, संचारबंदीमुळे कलेक्शन करतांना अडचण निर्माण झाली आहे. मंगळवारपर्यंत संचारबंदी असून, कलेक्शनला फटका बसणार आहे.

बँक एजंटांवर उपासमारीची वेळ
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील मोठ्या संख्येने पिग्मी एजंटांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू केल्यामुळे त्यांच्या दैनंदिन कलेक्शनला ब्रेक लागला आहे. पुढील महिन्यातील पगारावर याचा परिणाम होणार असून त्यांच्यासमोर आर्थिक संकट कोसळले आहे.
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे सर्व व्यवसाय बंद आहेत. अत्यावश्यक सेवा केवळ सुरू आहेत. यामध्ये बँका, पतसंस्था, सोसायटीचा समावेश आहे. असे असले तरी येथील बँकेच्या एजंटांना मात्र, संचारबंदीमुळे कलेक्शन करतांना अडचण निर्माण झाली आहे. मंगळवारपर्यंत संचारबंदी असून, कलेक्शनला फटका बसणार आहे. त्यामुळे मदत करण्याची मागणी केली जात आहे.
बँकांनी मदत करण्याची गरज
पिग्मी एजंट हा ग्राहक आणि बँक यामधील दुवा आहे. ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता ते काम करतात. कर्ज वसुली त्यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात होते तसेच रोख रक्कम मिळवून देणारा बँकांचा महत्त्वाचा घटक आहे. कोरोना व्हायरसमुळे त्यांच्यावर आर्थिक संकट आले असून बँकांनी त्यांना अडचणीत मदत करण्याची गरज आहे.
पुढील काही महिने संकटाचे
गेल्या काही महिन्यांपासून पिग्मी एजंटाचे कमिशन बँकांनी कमी केले आहे. पावसाळ्यामध्येही त्यांना फटका बसला. आता कोरोना वायरसमुळे संचारबंदीत त्यांचे काम बंद आहे. त्यांना अशा एकामागून एक संकटांना सामोरे जावे लागत आहे. १४ एप्रिलनंतरही बाजारपेठेची स्थिती लगेच सुधारेल असे चिन्ह नाही. त्यामुळे कोरोनामुळे पुढील तीन महिने तरी या एजंटावर आर्थिक संकट असणार आहे.