शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

बांबू वस्तू तयार करण्याच्या प्रशिक्षण केंद्र उभारणीला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 22:43 IST

जिल्ह्यातील चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून चिचपल्ली येथे भाऊ (बांबू हॅन्डीक्राफ्ट अ‍ॅन्ड आर्ट युनिट) केंद्राच्या बांधकामाला सुरूवात झाली आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव, जिल्हा परिषद सदस्य गौतम निमगडे, पंचायत समितीचे उपसभापती चंद्रकांत धोडरे, चिचपल्लीचे सरपंच श्रीकांत बावणे आदींची उपस्थिती होती.

ठळक मुद्दे२०० महिलांना प्रशिक्षण मिळणार : स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून चिचपल्ली येथे भाऊ (बांबू हॅन्डीक्राफ्ट अ‍ॅन्ड आर्ट युनिट) केंद्राच्या बांधकामाला सुरूवात झाली आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव, जिल्हा परिषद सदस्य गौतम निमगडे, पंचायत समितीचे उपसभापती चंद्रकांत धोडरे, चिचपल्लीचे सरपंच श्रीकांत बावणे आदींची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील यांनी केले. जि.प. अध्यक्ष भोंगळे म्हणाले, बांबू हॅन्डीक्राफ्ट अ‍ॅन्ड आर्ट युनिटच्या माध्यमातून बांबू वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण घेतल्यास स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध होईल. या माध्यमातून सर्वांगीण विकास होण्यास मदत होऊन आत्मनिर्भर होतील. चांदा ते बांदा योजनेंतर्गत भाऊच्या माध्यमातून सुमारे २०० महिलांना बांबू वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन त्याद्वारे स्वयंरोजगाराची संधी निर्माण करणे. महिला विकास महामंडळामार्फत इच्छुक महिलांची निवड करून प्रशिक्षणासाठी तयार करणे, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राकडून तज्ञ प्रशिक्षकांचे सहाय्याने ६० दिवसांत बांबू वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षणा दरम्यान महिलांना मानधन किंवा टूल कीट पुरवठा करण्यात येतो. सदर प्रशिक्षणासाठी भाऊ केंद्राची स्थापना करण्यात येते. यामध्ये अत्याधुनिक यंत्र सामुग्री उपलब्ध करून देण्यात येऊन त्याद्वारे महिलांना बांबूच्या दजेर्दार वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते.महिलांनी तयार केलेल्या बांबू वस्तूच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिल्या जाते. भविष्यात महिलांची सहकारी संस्था स्थापन करून त्याच्या रोजगारासाठी चालना देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि आर्थिक तरतूद करण्यात येते. जी. सी. मेश्राम यांनी आभार मानले.चिमूर काँग्रेसचे दोन माजी तालुकाध्यक्ष भाजपातचिमूर : ऐन निवडणुकीच्या तोंडावर तालुक्यातील काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष तथा आजीवन गुरुदेव प्रचारक राजू देवतळे व युवक काँग्रेस माजी तालुका अध्यक्ष राजू दांडेकर यांनी काँग्रेसला रामराम करीत भाजपात प्रवेश केला आहे. यामुळे काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.चिमूर येथे आयोजित स्नेहमिलन सोहळ्यात या पक्षप्रवेशाची औपचारिकता पार पडली. याप्रसंगी खासदार अशोक नेते व आमदार कीर्तीकुमार भांगडिया, वसंत वारजूकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. शाम हटवादे, तालुका अध्यक्ष डॉ. दिलीप शिवरकर, जि.प.सदस्य रेखा कारेकर, नगरसेवक भारती गोडे, पं.स.सदस्य अजहर शेख, दिगांबर खलोरे, मजहर शेख, डॉ. दीपक यावले, विनोद अढाल, बकाराम मालोदे आदी उपस्थित होते.पेठगाव-राजोली-तांबेगडी मेंढा मार्गातील पूल वाहतुकीला खुलाराजोली : मुल तालुक्यातील राजोली येथे पेठगाव-राजोली-तांबेगडी मेंढा या मार्गावर १० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला पूल दळणवळणासाठी सुरू झाला आहे. तसेच राजोली येथे ७ कोटी ५० लाख रुपये खर्चून प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभारण्यात येणार असून या इमारत बांधकामाचा प्रारंभ करण्यात आला आहे.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, जि. प. उपाध्यक्ष कृष्णा सहारे, माजी जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले, जि. प. सभापती संतोष तंगडपल्लीवार, पंचायत समिती सभापती पूजा डोहणे, उपसभापती चंदु मारगोनवार, जि.प.सदस्य नागराज गेडाम, पं.स. सदस्य घनश्याम जुमनाके, वर्षा लोनबले, जयश्री वलकेवार, मुलचे नगरसेवक चंद्रकांत आष्टनकर, डोंगरगाव सरपंच मुकेश गेडाम, माजी उपसभापती गजानन वलकेवार, सुरेश पाटील ठिकरे, विजय पाकमोडे यांच्यासह कार्यकारी अभियंता कोठारी, बुरांडे आदींची उपस्थिती होती.