गांधी बागेत योगनृत्याला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:39 IST2021-02-05T07:39:32+5:302021-02-05T07:39:32+5:30

वरोरा : कोरोनामुळे गांधी बागेतील योगनृत्य बंद करण्यात आला होते. राज्य शासनाने प्रतिबंध शिथिल केल्याने याेग नृत्य कार्यक्रम पुन्हा ...

Start of yoga dance in Gandhi Bagh | गांधी बागेत योगनृत्याला प्रारंभ

गांधी बागेत योगनृत्याला प्रारंभ

वरोरा : कोरोनामुळे गांधी बागेतील योगनृत्य बंद करण्यात आला होते. राज्य शासनाने प्रतिबंध शिथिल केल्याने याेग नृत्य कार्यक्रम पुन्हा सुरू झाला आहे. आमदार प्रतिभा धानाेरकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रमुख पाहुणे शिराेमणी मनाेहर स्वामी व याेग परिवाराचे जिल्हा प्रमुख गाेपाल मुंधडा, वराेरा प्रमुख अविनाश मडावी, रवी डाहुले उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने झाली. त्यानंतर याेगसाधकांनी याेगनृत्य सादर केले. आमदार प्रतिभा धानाेरकर आजच्या धकाधकीच्या जीवनात निराेगी व सुदृढ शरीराकरिता याेगाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रप्रमुख मडावी म्हणाल्या, आराेग्यासाठी दिवसातून किमान अर्धा तास स्वत:ला द्यावा. शहरातील गांधी बागेत सकाळी ६ वाजता योगनृत्य नियमित सुरू हाेते, अशी माहिती केंद्रप्रमुख मडावी यांनी दिली.

संचालन अविनाश मडावी, प्रास्ताविक कानकाटे यांनी केले. दिलीप गजभे यांनी आभार मानले. आयोजनासाठी चैताली थेटे, पुष्पा डाेळस, प्रिया गावंडे, मनीषा कान्स्कर, सुरेखा देवतळे, नीता गजभे, संगीता साटोणे, शीला पारकी, रोशनी पाटील, गहूकर आदींनी सहकार्य केले.

Web Title: Start of yoga dance in Gandhi Bagh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.