वरोरातही लसीकरणाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:24 IST2021-01-17T04:24:47+5:302021-01-17T04:24:47+5:30
८० मिनिटांमध्ये २० व्यक्तींना लसीकरण करण्यात आले. कोरोना लसीकरण केंद्राचे उद्घाटन खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ...

वरोरातही लसीकरणाला प्रारंभ
८० मिनिटांमध्ये २० व्यक्तींना लसीकरण करण्यात आले. कोरोना लसीकरण केंद्राचे उद्घाटन खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पांडे, उपजिल्हा रुग्णालय वरोराचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंकुश राठोड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळ मुंज, प्रतीक दारुडे, डॉ. प्रतीक बोरकर, गोविंद कुंभारे, डॉ. प्रफुल आंबेडकर उपस्थित होते. सर्वप्रथम उपजिल्हा रुग्णालय वरोराचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. एम. शेख यांना लस देण्यात आली. वरोरा उपजिल्हा रुग्णालयाला ५३० लस प्राप्त झाले. एका दिवसात १०० व्यक्तींना लस दिली जाणार आहे. लसीकरणाचा पहिल्या टप्प्यात शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी व खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांना लस दिली जाणार असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालय वरोराचे वैद्यकीय अधीक्षक अंकुश राठोड यांनी दिली.