शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

मुंबई, पुणेसाठी रेल्वे सुरू करा; प्रवासी संघाने सुरू केले उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 12:57 IST

वरोरा, भद्रावती, चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघ : तीव्र आंदोलनाचा दिला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : मुंबई, पुणेसाठी नियमित रेल्वे सुरू करावी, विविध एक्स्प्रेस गाड्यांचा वरोरा येथे थांबा द्यावा, बल्लारशहा ते नागपूर, वर्धा, अमरावती, शेगावसाठी इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करावी, बल्लारशहा ते हावडा नवीन एक्स्प्रेस सुरू करावी, रेल्वे स्टेशनवर डिस्प्ले बोर्ड लावावे या व अन्य मागण्यांना घेऊन वरोरा, भद्रावती, चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाचे मागील तीन दिवसांपासून वरोरा येथे साखळी उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार प्रवासी संघटनेने घेतला आहे. 

वरोरा, भद्रावती, चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष राजेंद्र मर्दाने यांच्या नेतृत्वाखाली खेमचंद नेरकर, अशोक बावणे आणि प्रवीण गंधारे यांच्यासह अन्य सदस्यांनी उपोषण सुरू केले. 

सध्या जिल्ह्यासाठी रेल्वेची सुविधा महत्त्वाची मानली जात आहे. मात्र रेल्वे प्रशासन, लोकप्रतिनिधींनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. औद्योगिक जिल्हा असतानाही मुंबई, पुण्यासारख्या शहरामध्ये जाण्यासाठी नियमित ट्रेन नाही. त्यामुळे आता प्रवासी संघटनांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. या उपोषणाला विविध सामाजिक, राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. 

नियमित रेल्वे नसल्याने तसेच वरोरा येथे काही रेल्वेचा थांबा नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना, विद्यार्थ्यांना, शासकीय अधिकारी, कर्मचारी, व्यापाऱ्यांना एसटीने किंवा खासगी बसने प्रवास करावा लागतो. यामध्ये आर्थिक तसेच शारीरिक त्रास सहन करावा लागतो. उपोषणाला अनेकांनी पाठिंबा दिला असून, यानंतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वरोरा, भद्रावती, चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष राजेंद्र मर्दाने यांच्यासह अन्य सदस्यांनी दिला आहे. यावेळी प्रवासी संघाचे राहुल देवडे, बबलू रॉय, जगदीश तोटावार, विलास दारापूरकर, प्रवीण सुराणा, विवेक बर्वे, छोटूभाई शेख, शाहिद अख्तर, डॉ. मुधोळकर, ठाकूरदास मर्दाने, जुबेर कुरेशी, तुषार मर्दाने आदींची उपस्थिती होती.

वेळोवेळी आंदोलन मुंबई, पुणेसाठी नियमित रेल्वे सुरु करण्यासाठी विविध प्रवासी संघटनांनी वेळोवेळी आंदोलन केले. मात्र अद्यापतरी जिल्ह्याला न्याय मिळाला नाही. मालवाहू रेल्वेच्या माध्यमातून रेल्वे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो, मात्र प्रवाशांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप केला जात आहे.

टॅग्स :railwayरेल्वेchandrapur-acचंद्रपूर