विजासन बौद्ध लेणी येथील मंजूर विकासकामे सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:32 IST2017-07-18T00:32:33+5:302017-07-18T00:32:33+5:30

शहरातील ऐतिहासिक विजासन बुद्ध लेणीची मंजूर विकासकामे तात्काळ सुरु करण्यात यावी, ...

Start the sanctioned development works at the Vizasan Buddhist Caves | विजासन बौद्ध लेणी येथील मंजूर विकासकामे सुरू करा

विजासन बौद्ध लेणी येथील मंजूर विकासकामे सुरू करा

तीव्र आंदोलनाचा इशारा : भारिप बहुजन महासंघाचे नगराध्यक्षांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : शहरातील ऐतिहासिक विजासन बुद्ध लेणीची मंजूर विकासकामे तात्काळ सुरु करण्यात यावी, अन्यथा भारिप बहुजन महासंघ तालुका व शहर शाखेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा भद्रावतीचे नगर परिषदेचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला.
नगर परिषद भद्रावतीमध्ये ३० मे २०१६ रोजी सर्वसाधारण सभेत विजासन बुध्द लेणीच्या विकासासंबंधी ठराव करण्यात आला. त्यामध्ये तेथील जोडरस्ता, संरक्षण भिंत, बालोद्यान, बगीचा, पार्किंग झोन, मैदान लेवलिंग, किचनशेड, विद्युतीकरण करण्याचा समावेश होता. प्रादेशिक पर्यटन विभागाकडून त्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. न.प. भद्रावती मधून विकासकामांच्या निविदा काढण्यात आल्या. ऐवढेच नाहीतर २ मे २०१७ रोजीच्या सर्वसाधारण सभेत त्यांना मंजुरी देण्यात आली.
परंतु, या घटनेला बरेच दिवसांचा कालावधी लोटला. मात्र अजूनही विकासकामांना सुरुवात झालेली नाही. त्यामुळे भद्रावतीतील बौध्द जनतेमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे विजासन बौद्ध लेणी येथील मंजुर विकासकाम त्वरीत सुरु करण्यात यावी, अन्यथा भारिप बहुजन महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात भारिप बहुजन महासंघाचे पक्ष निरीक्षक कुशल मेश्राम, जिल्हा संघटक कपूरदास दुपारे, जिल्हा उपाध्यक्ष सुरज गावंडे, विधानसभा प्रमुख सुनिल खोब्रागडे, तालुका अध्यक्ष हाजी आदिल शेख, तालुका महासचिव विजय इंगोले, नगरसेविका राखी रामटेके, शहराध्यक्ष सुयोग देवगडे, शहर महासचिव अरविंद घडले, तालुका उपाध्यक्ष विशाल कांबळे, विठ्ठल पुनवटकर, अमित सुर्यवंशी, राजू भैसारे, मनोहर ढवस, अजय पाटील, राजेश चव्हाण, राहूल चौधरी, राजू लभाने, विजय पाटील, संजय पाटील, बालक चंहादे, लता टिपले, संध्या पेटकर, रजनीकुंदा रायपुरे, शोभा जिवने, रजना भाले, लिना उमरे, बबली पेटकर आदी उपस्थित होते.

Web Title: Start the sanctioned development works at the Vizasan Buddhist Caves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.