नागपूर - बल्लारपूर शटल ट्रेन सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:26 IST2021-03-08T04:26:44+5:302021-03-08T04:26:44+5:30

गडचांदूर - जिवती मार्गाचे रुंदीकरण करा जिवती : येथून नगराळा मार्गे जिवतीकडे जाणारा रस्ता अतिशय अरुंद आहे. त्यामुळे त्याचे ...

Start Nagpur - Ballarpur shuttle train | नागपूर - बल्लारपूर शटल ट्रेन सुरू करा

नागपूर - बल्लारपूर शटल ट्रेन सुरू करा

गडचांदूर - जिवती मार्गाचे रुंदीकरण करा

जिवती : येथून नगराळा मार्गे जिवतीकडे जाणारा रस्ता अतिशय अरुंद आहे. त्यामुळे त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या मार्गावर अनेक प्रेक्षणीय स्थळे व तेलंगणा राज्याला जोडणारा असल्याने येथून वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, डोंगर माथ्यावर हा मार्ग अतिशय अरुंद आहे. परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष पुरवावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पांदण रस्त्यांवर अतिक्रमण वाढले

वरोरा : तालुक्यातील पांदण रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. यासंदर्भात तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पांदण रस्ते व गावाची शिव आता संकटात आहे. त्यामुळे अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी पक्के रस्ते तयार करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

कोंडवाड्यातील जनावरे असुरक्षित

नागभीड : जिल्ह्यात अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीने कोंडवाडे बांधले आहे. मात्र, सध्या या कोंडवाड्याची दुरवस्था झाली आहे. कोंडवाड्यामध्ये चारा आणि जनावरांना पिण्यासाठी पाण्याची सोय करणे अत्यावश्यक आहे. मात्र, ती करण्यात येत नसल्याने जनावरे असुरक्षित आहेत.

कुत्र्यांच्या हैदोसाने नागरिक त्रस्त

बल्लारपूर : शहरात रात्रीच्या वेळी मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीने जात असताना ही मोकाट कुत्री अचानक गाडीवर झेप घेतात. यामुळे अपघातही वाढले आहेत. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

आठवडी बाजारात सुविधांचा अभाव

चंद्रपूर : जिल्ह्यातील विविध गावांमध्ये आठवडा बाजार भरतो. या बाजाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असली तरी बहुतांश बाजारामध्ये सोयीसुविधा नसल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात तर अनेक बाजारात मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य निर्माण होते.

Web Title: Start Nagpur - Ballarpur shuttle train