लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्रातील शेतकºयाला विविध समस्या भेडसावत असताना पीक हातात येऊनही शासनाने कापूस व सोयाबिनची खरेदी सुरु केली नाही. परिणामी शेतकºयांची दिवाळी अंधारात गेली. त्यामुळे शासनाने त्वरीत कापूस व सोयाबिनची खरेदी सुरु करावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.पूर्वीपासूनच शेतकरी विविध अडचणीत सापडला आहे. त्यातही शासनाच्या वतीने कुठलीही उपाय योजना आखली जात नाही. त्यातही शेतकºयांच्या हातात पीक येऊनही महाराष्ट्र सरकारने कापूस व सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले नाही. त्यामुळे पीक हातात असूनही शेतकºयांच्या हातात पैसा नाही. त्यामुळे कापूस व सोयाबीन खरेदी केंद्र त्वरीत सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे आ. बाळू धानोरकर, जिल्हा प्रमुख सतीश भिवगडे व अनिल धानोरकर, शहर प्रमुख सुरेश पचारे, युवा सेना प्रमुख संदीप गिºहे, महिला आघाडी अध्यक्ष भारती दुधानी, विजया रोगे, उपाध्यक्ष प्रफुल चटकी, सभापती विशाल बदखल, महिला आघाडी शहर प्रमुख सायली येरणे, अशोक चिरखरे, आरिफ शेख, अजय कोंडलेवार उपस्थित होते.
कापूस व सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 22:56 IST
महाराष्ट्रातील शेतकºयाला विविध समस्या भेडसावत असताना पीक हातात येऊनही शासनाने कापूस व सोयाबिनची खरेदी सुरु केली नाही.
कापूस व सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावे
ठळक मुद्देशिवसेनेची मागणी : जिल्हाधिकाºयांना निवेदन