चिमूर ते माकोना बस पूर्वरत सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:29 IST2021-01-23T04:29:02+5:302021-01-23T04:29:02+5:30

चिमूर : सावरी, माकोना परिसरातील ५० विद्यार्थी उच्चशिक्षण घेण्यासाठी बोथली, शेगाव वरोरा व चिमूर येथे दररोज ...

Start Chimur to Makona bus east | चिमूर ते माकोना बस पूर्वरत सुरू करा

चिमूर ते माकोना बस पूर्वरत सुरू करा

चिमूर : सावरी, माकोना परिसरातील ५० विद्यार्थी उच्चशिक्षण घेण्यासाठी बोथली, शेगाव वरोरा व चिमूर येथे दररोज ये-जा करीत असतात. सावरी ते बोथली हे पाच किलोमीटरचे अंतर विद्यार्थी सायकलने गाठतात. त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, तेव्हा चिमूर ते माकोना बस पूर्ववत सुरू करण्याची मागणी नागरिकांनी आगार व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

सावरी, माकोना परिसरात जंगल लागून असल्याने जंगली प्राण्यांचा सामना करावा लागतो व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे या परिसरात वन्यप्राणी जास्त प्रमाणात दिसून येतात. या परिसरात वाघ, अस्वल, रानडुक्कर वावरत असतात. त्यामुळे काही दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा विद्यार्थ्यांसाठी चिमूर ते माकोना बससेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी रापम आगारप्रमुख यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रहारचे विनोद उमरे, स्वप्निल खोब्रागडे, लोकेश मंगरे, सचिन घानोडे, नारायणन निखाडे, मुरलीधर रामटेके, संदीप निखाडे, नारायणन मत्ते उपस्थित होते.

Web Title: Start Chimur to Makona bus east

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.