चिमूर-आष्टी क्रांती एक्स्प्रेस बसफेरी सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:25 AM2021-03-07T04:25:38+5:302021-03-07T04:25:38+5:30

चिमूर : चिमूर, आष्टी स्वातंत्र्य संग्राम क्रांतीचा इतिहास देशवासीयांना भविष्यातही माहिती राहावा, म्हणून चिमूर बस आगार अस्तित्वात नसताना चिमूर-आष्टी ...

Start Chimur-Ashti Kranti Express bus ride | चिमूर-आष्टी क्रांती एक्स्प्रेस बसफेरी सुरू करा

चिमूर-आष्टी क्रांती एक्स्प्रेस बसफेरी सुरू करा

googlenewsNext

चिमूर : चिमूर, आष्टी स्वातंत्र्य संग्राम क्रांतीचा इतिहास देशवासीयांना भविष्यातही माहिती राहावा, म्हणून चिमूर बस आगार अस्तित्वात नसताना चिमूर-आष्टी सुपर एक्स्प्रेस बसफेरी सुरू होती. मात्र, स्वतंत्र चिमूर बस आगार निर्माण झाल्यानंतर चिमूर-आष्टी सुपर एक्स्प्रेस बसफेरीमागील अनेक वर्षांपासून बंद करण्यात आली आहे. चिमूर-आष्टी बसफेरी तत्काळ सुरू करण्याची मागणी चिमूर व्यापारी मंडळाने केली आहे.

१९४२च्या चिमूर-आष्टी स्वातंत्र संग्राम क्रांतीबाबत अनेकांना माहिती नाही, तर अनेक ज्येष्ठ नागरिकांना चिमूरमधील इतिहासाचा विसर पडलेला आहे. जनप्रतिनिधी व राजकारण्यांना स्वत:च्या स्वार्थाशिवाय क्रांती भूमीकडे लक्ष देण्यास वेळ नाही. चिमूर, आष्टी क्रांती एसटी सेवा सुरू झाल्याने भविष्यातील क्रांती संग्रामाबदल अनेक नागरिकांना संग्रामाची माहिती होईल व चिमूर आष्टी क्रांतीची एक आठवण राहील. बालाजी महाराज बहुउद्देशीय व्यापारी मंडळ चिमूरचे अध्यक्ष प्रकाश बोकारे व सचिव तथा चिमूर क्रांती भूमीला व शहिदांना देश पातळीवर सन्मानित करण्याच्या चळवळीचे मुख्य संयोजक सारंग दाभेकर यांनी एसटी बस आगार चिमूरचे प्रभारी आगार व्यवस्थापक इम्रान शेख यांना चिमूर-आष्टी सुपर क्रांती एक्स्प्रेस तत्काळ सुरू करण्याबाबत शनिवारी निवेदन दिले आहे.

Web Title: Start Chimur-Ashti Kranti Express bus ride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.