वरोऱ्यात कापूस खरेदीला प्रारंभ
By Admin | Updated: October 16, 2014 23:22 IST2014-10-16T23:22:26+5:302014-10-16T23:22:26+5:30
पांढऱ्या सोन्याची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरोरा शहरात कापूस खरेदीला प्रारंभ झाला. गुरुवारी चार हजार अकरा रुपये प्रती क्विंटल भावाने कापसाची खरेदी करण्यात आली.

वरोऱ्यात कापूस खरेदीला प्रारंभ
शेतकऱ्यांना दिलासा : दिवाळीसाठी पैशाचा बंदोबस्त
वरोरा : पांढऱ्या सोन्याची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरोरा शहरात कापूस खरेदीला प्रारंभ झाला. गुरुवारी चार हजार अकरा रुपये प्रती क्विंटल भावाने कापसाची खरेदी करण्यात आली.
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाची लागवड वाढली आहे. सध्या सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सोयाबीनची काही शेतकऱ्यांनी कापणी केली आहे. मात्र पाहिजे तसे उत्पन्न मिळत नसल्याच्या शेतकऱ्याचे म्हणणे आहे. यावर्षीे सोयाबिनची प्रतवारी खराब असल्याने बाजारभाव कमी मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे घरी आलेला कापूस विक्री करून दिवाळी साजरी करण्यासाठी शेतकरी धडपडत आहे. मात्र अद्यापही राज्यातील कापसाची बाजारपेठ सुरू झाली नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. कापूस खरेदीकधी होणार याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीकडे शेतकरी विचारत होते. कृषी उत्पन्न बाजार समिती पुढाकार घेऊन येथे खासगी कापूस खरेदीला प्रारंभ केला. पहिल्या दिवशी ७० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. प्रथम कापूस घेऊन येणारे शेंबळ येथील शेतकरी विठ्ठल धांडे यांचा निरंज गोठी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून सत्कारकरण्यात आला. यावेळी बाजार समितीचे सभापती रवींद्र कष्टी, सुरेंद्र देठे, अमोल मुथा, विनोदकुमार बाफना, प्रतिक मुथा आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)