चंद्रपूर-भद्रावती माजरी वरोरामार्गे बस सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:20 IST2021-07-01T04:20:21+5:302021-07-01T04:20:21+5:30

शासन कधी लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता देते तर कधी पुन्हा निर्बंध लावत आहे. परिवहन महामंडळाच्या बस जिल्ह्यातील अनेक ठिकाणावरून ...

Start the bus via Chandrapur-Bhadravati Majri Warora | चंद्रपूर-भद्रावती माजरी वरोरामार्गे बस सुरू करा

चंद्रपूर-भद्रावती माजरी वरोरामार्गे बस सुरू करा

शासन कधी लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता देते तर कधी पुन्हा निर्बंध लावत आहे. परिवहन महामंडळाच्या बस जिल्ह्यातील अनेक ठिकाणावरून सुरू केल्या आहे. परंतु माजरीवरून वरोरा- भद्रावती-चंद्रपूरकरिता एकही बस नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

कोरोनाच्या भीतीने ऑटोरिक्षांचेही धंदे मंदावले असून कमी प्रमाणात ऑटो सुरू आहे. त्यातही भाडे वाढल्याने सामान्य माणसाला आर्थिक अडचण निर्माण झालेली आहे.

अनेक शेतकऱ्यांना बी- बियाणे आणण्यासाठी तालुका स्थळावर किंवा जवळच्या शहरात जावे लागते. मजूर वर्ग रोजगारासाठी बसने प्रवास करतात. अनेक जण नोकरीवर जाण्यासाठी महामंडळाच्या बसने प्रवास करतात. शासनाने बससेवा जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून पुन्हा सुरू केली आहे. परंतु चंद्रपूरवरून भद्रावती, कोंढा, माजरी, पाटाळामार्गे सकाळ, संध्याकाळ दोन वेळा बस सुरू करावी, अशी मागणी आहे.

Web Title: Start the bus via Chandrapur-Bhadravati Majri Warora