शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

ब्रह्मपुरी महोत्सवाला धडाक्यात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:19 AM

गुरुवारी सकाळी शहरात राबविलेल्या स्वच्छता अभियानाने ब्रह्मपुरी महोत्सवाला धडाक्यात प्रारंभ झाला. ब्रह्मपुरी शहर नववधुप्रमाणे सजले होते. रॅलीने शहर दुमदुमले. त्यानंतर सायंकाळी सिनेकलावंतांच्या उपस्थित महोत्सवाचे रीतसर उद्घाटन करण्यात आले.

ठळक मुद्देरॅलीने दुमदुमले ब्रह्मपुरी : स्वच्छता मोहिमेत केली शहरातील रस्त्यांची सफाई

रवी रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : गुरुवारी सकाळी शहरात राबविलेल्या स्वच्छता अभियानाने ब्रह्मपुरी महोत्सवाला धडाक्यात प्रारंभ झाला. ब्रह्मपुरी शहर नववधुप्रमाणे सजले होते. रॅलीने शहर दुमदुमले. त्यानंतर सायंकाळी सिनेकलावंतांच्या उपस्थित महोत्सवाचे रीतसर उद्घाटन करण्यात आले. यावेळी सिनेकलावंतांना बघण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली होती.ब्रह्मपुरी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी आयोजक विजय वडेट्टीवार, मुख्याधिकारी मंगेश खवले व अभियान प्रमुख मुन्ना रामटेके यांच्या नेतृत्वात शहरातील प्रमुख रस्त्यांची सफाई करण्यात आली. यामध्ये शहरातील सर्व शाळेचे विद्यार्थी, महाविद्यालयातील विद्यार्थी, सामाजिक संघटना, महिला वर्ग आदी बहुसंख्येने उपस्थित होते. दुपारी ३ वाजता तहसील ग्राऊंडवरून रॅली शहराच्या प्रमुख मार्गाने काढण्यात आली. विविध देखावे लक्ष वेधून घेत होते. बेटी बचाव, व्यसन, सर्वधर्म समभाव, गोंडी नृत्य, घोडे, लेझीम तथा विशिष्ट पोशाखात विद्यार्थी व विद्यार्र्थिनींनी सहभाग घेतला होता. रॅलीत आयोजक आमदार विजय वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, तालुकाध्यक्ष खेमराज तिडके, शहराध्यक्ष बाळू राऊत, विलास विखार, मनोज कावळे, नंदू पिसे, नितीन उराडे, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, प्रतिभा फुलझेले, अशोक रामटेके, रश्मी पेशने आदी सहभागी झाले होते.सिनेकलावंतांचे आकर्षणमहोत्सवाच्या उद्घाटक म्हणून सिनेअभिनेता सयाजी शिंदे तर अध्यक्षस्थानी आमदार विजय वडेट्टीवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेता असरानी, सिनेअभिनेत्री मुग्धा गोडसे, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर, जि.प. गटनेता डॉ. सतीश वारजुकर, प्रा. राजेश कांबळे, अशोक रामटेके आदी उपस्थित होते. यावेळी असरानी यांनी ब्रह्मपुरी महोत्सवाची प्रशंसा करून आयोजनाला दाद दिली. सिनेकलावंत हे उद्घाटनीय कार्यक्रमाचे आकर्षण होते.