शिक्षिकेचा पती व मुख्याध्यापकांत हाणामारी
By Admin | Updated: June 19, 2015 01:48 IST2015-06-19T01:48:07+5:302015-06-19T01:48:07+5:30
तुकूम येथील मातोश्री विद्यालयात गुरूवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास गैरहजेरीचा नोटीसवरुन मुख्याध्यापक ...

शिक्षिकेचा पती व मुख्याध्यापकांत हाणामारी
शहरात खळबळ : मातोश्री विद्यालयातील घटना
दुर्गापूर : तुकूम येथील मातोश्री विद्यालयात गुरूवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास गैरहजेरीचा नोटीसवरुन मुख्याध्यापक व एका शिक्षिकेचा पती या दोघांत तुंबळ हाणामारी झाली. यात जखमी पती व मुख्याध्यापक या दोघांनीही दुर्गापूर पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्या आहेत. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल झाला नव्हता.
तुकूम येथील मातोश्री विद्यालयात हिरा झांबड नामक शिक्षिका कार्यरत आहेत. ही शाळा सुरू झाल्यापासून सतत गैरहजर होती. त्यामुळे तिला मुख्याध्यापक सूर्यकांत खनके यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यामुळे संतापलेल्या हिरा झांबड यांनी त्यांचे पती संजय झांबड यांना सोबत घेऊन मुख्याध्यापकांना भेटण्याकरीता त्यांच्या कार्यालयात गेल्या. यावेळी चर्चेदरम्यान त्यांच्यात शाब्दिक चकामक झाली. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. यात संजय झांबडने मारहाण केल्याची व मुख्याध्यापकांनी शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी दोघांनीही एकमेकांविरुद्ध दुर्गापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. या घटनेने शालेय वर्तुळात खळबळ उडाली (वार्ताहर)