कोरोना लढ्यासाठी कर्मचाऱ्यांची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:30 IST2021-05-27T04:30:28+5:302021-05-27T04:30:28+5:30
वीज खांबामुळे अपघाताचा धोका चंद्रपूर : येथील अनेक वॉर्डातील रस्त्यालगत असलेले विद्युत खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात ...

कोरोना लढ्यासाठी कर्मचाऱ्यांची कसरत
वीज खांबामुळे अपघाताचा धोका
चंद्रपूर : येथील अनेक वॉर्डातील रस्त्यालगत असलेले विद्युत खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे खांब बदलविण्याची मागणी होत आहे. यापूर्वी अनेकदा सदर खांब बदलविण्याची मागणी नागरिकांकडून झाली आहे. परंतु याकडे दुर्लक्ष झाले.
धान उत्पादकांना बोनस द्यावा
चंद्रपूर : राज्य शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना आधारभूत किमतीवर जाहीर केलेला ७०० रुपये बोनस अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही. कोरोनामुळे त्यांच्या घरीच राहावे लागत आहे. परिणामी आर्थिक अडचणींना सामोरा जावे लागत आहे. शेतकऱ्यांना तातडीने बोनस देण्याची मागणी केली जात आहे.
मातीच्या ढिगाऱ्यावर
वन्यप्राण्यांचा वावर
गोवरी : परिसरातील वेकोलिने तयार केलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर मोठ्या प्रमाणात काटेरी झुडूपे तयार झाल्याने या ठिकाणी दिवसरात्र वन्यप्राण्यांचा संचार सुरू आहे. जंगलालगत असलेली शेती वन्यप्राण्यांकडून उद्ध्वस्त केली जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.