कोरोना काळातील त्या प्रोत्साहन भत्यापासून एसटीचे चालक-वाहक अद्यापही वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:25 IST2021-03-22T04:25:10+5:302021-03-22T04:25:10+5:30
चंद्रपूर : बाहेरगावी कामावर असताना लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या मजुरांना एसटी महामंडळाने मदतीचा हात देत विशेष बसफेऱ्या सुरु केल्या होत्या. ...

कोरोना काळातील त्या प्रोत्साहन भत्यापासून एसटीचे चालक-वाहक अद्यापही वंचित
चंद्रपूर : बाहेरगावी कामावर असताना लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या मजुरांना एसटी महामंडळाने मदतीचा हात देत विशेष बसफेऱ्या सुरु केल्या होत्या. या बसवर कर्तव्यावर असणाऱ्या चालक वाहकांना ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार होता. मात्र आठ महिन्याचा कालावधी लोटूनही चालक वाहकांना प्रोत्साहन भत्ता देण्यात आला नाही. त्यामुळे आपला जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्याची प्रतीक्षा आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात लॉकडाऊनमध्ये शासकीय कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची ने-आण करणाऱ्या चालक व वाहकांना प्रोत्साहन भत्ता देण्याची योजना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सुरु केली होती. या निर्णयाचे एसटी कर्मचाऱ्यांनी स्वागत केले. लॉकडाऊन काळात चंद्रपूर शहरातून अनेक एसटी बसमधून परराज्यात जाणाऱ्या हजारो श्रमिकांकरिता सोडण्यात आली. या बसवर काम करणाऱ्या चालक व वाहकाला ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची मागणी एसटी कर्मचारी संघटनेने केली होती. परंतु, अद्यापही या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात आला नाही. चंद्रपुरातून १५१ बसेस परराज्यात पाठविल्याची माहिती चंद्रपूर आगारातून मिळाली.
बॉक्स
वाहक चालक पॉझिटिव्ह
कोरोनाच्या दहशतीत एसटी महामंडळाद्वारे सोडलेल्या बसफेऱ्यांमध्ये अनेक चालक व वाहकांनी प्रामाणिक सेवा बजावली. त्यामध्ये काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. मात्र अद्यापही या कर्मचाऱ्यांना महामंडळातर्फे देण्यात येणारा प्रोत्साहन भत्ता देण्यात आला नाही.
कोट
कोरोना संचारबंदी काळात सेवा बजावणाऱ्या प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. जिल्ह्याबाहेर माल वाहतूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांसुद्धा प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, अशी मागणीला एसटी कामगार संघटनेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. मात्र अद्यापही कोणत्याही कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात आला नाही. त्वरित प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
- दत्ता बावणे, विभागीय सचिव, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, चंद्रपूर
त्यांच्या मूळ गावी पोहचवून देण्यासाठी राज्य परिवहन मंडळाने विशेष बसेस सोडल्या होत्या. या बसवर चालक व वाहक म्हणून काम करणाऱ्या चालक व वाहकांना ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार होता.