स्टंटबाजी करताना हटकल्यामुळे एसटी चालकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:26 IST2021-03-15T04:26:05+5:302021-03-15T04:26:05+5:30

एसटी क्रमांक एमएच ४०- ६२३१ चा चालक सुशीलकुमार वामन नारळे रा. वरोरा हा ...

ST driver beaten for stunting | स्टंटबाजी करताना हटकल्यामुळे एसटी चालकाला मारहाण

स्टंटबाजी करताना हटकल्यामुळे एसटी चालकाला मारहाण

एसटी क्रमांक एमएच ४०- ६२३१ चा चालक सुशीलकुमार वामन नारळे रा. वरोरा हा चंद्रपूर मांजरी मार्गे वणीकडे जाण्यासाठी बसस्थानकावरून निघाला. दरम्यान एसटीच्या मागून दुचाकी क्रमांक एमएच ३४ एक्सवाय ९११४ हा दुचाकीस्वार एकाला मागे बसवून एसटीला ओव्हरटेक करून मुख्य मार्गावर स्टंटबाजी करत होता. त्याचा हा प्रकार कोंढा फाट्यापर्यंत चालू होता. एसटीचालकाने वाहन थांबवून त्याला हटकले असता त्यांनी दुचाकी रस्त्यावर उभी करून दोघांनी एसटी वाहनाची तोडफोड केली. नंतर वाहन चालकाला मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार प्रवासी बघत होते. यातील काही प्रवासी बाहेर निघाले असता हे दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेत चालक जखमी झाला असून या घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात देण्यात आली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Web Title: ST driver beaten for stunting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.