एसटी बसची स्कूल बसला धडक

By Admin | Updated: August 24, 2016 00:24 IST2016-08-24T00:24:49+5:302016-08-24T00:24:49+5:30

नागपूरवरुन चंद्रपूरकडे जाणाऱ्या एस.टी. बसची लहन विद्यार्थ्यांना कॉन्व्हेंटमध्ये नेत असलेल्या मिनी स्कूल बसला मागून धडक बसली.

ST bus school bus hits | एसटी बसची स्कूल बसला धडक

एसटी बसची स्कूल बसला धडक

भद्रावती येथील घटना : १७ विद्यार्थी बचावले
भद्रावती : नागपूरवरुन चंद्रपूरकडे जाणाऱ्या एस.टी. बसची लहन विद्यार्थ्यांना कॉन्व्हेंटमध्ये नेत असलेल्या मिनी स्कूल बसला मागून धडक बसली. मात्र ही धडक किरकोळ असल्याने सुदैवाने स्कूृल बसमधील १७ विद्यार्थी थोडक्यात बचावले. त्यांना कोणतीही इजा झाली नाही. सदर घटना सुमठाणा भागात मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.
मिनी स्कूल बस क्र. एम.एच. ३४ ए.बी. ८११० ही १७ विद्यार्थ्यांना घेवून पॉवरग्रिड येथील टिष्ट्वंकल स्टार किडल गार्डन या कॉन्व्हेंटकडे जात असताना मागून येणाऱ्या नागपूर-चंद्रपूर एम.एच. ४० वाय ५८८९ या क्रमांकाच्या बसची धडक बसली. ही धडक किरकोळ असल्याने कोणतीही अनुचित घडली नाही. सुदैवाने मिनी स्कूल बसमधील १७ ही विद्यार्थी बचावले.
घटनेनंतर स्कूल बस दुभाजकावर चढली. नागरिक घटनास्थळी जमा होऊन स्कूल बसला रस्त्यावर आणले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: ST bus school bus hits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.