घुग्घुसमध्ये स्रीशक्तीचा जागर महिला संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:51 IST2021-02-21T04:51:59+5:302021-02-21T04:51:59+5:30

घुग्घुस : महिला काँग्रेस घुग्घुसतर्फे स्रीशक्तीचा जागर महिला संमेलन पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते ...

Srishakti's Awakening Women's Meeting in Ghughhus | घुग्घुसमध्ये स्रीशक्तीचा जागर महिला संमेलन

घुग्घुसमध्ये स्रीशक्तीचा जागर महिला संमेलन

घुग्घुस : महिला काँग्रेस घुग्घुसतर्फे स्रीशक्तीचा जागर महिला संमेलन पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी शिवणी वडेट्टीवार होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्य सुनीता लोढीया, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा चित्रा डांगे मंचावर उपस्थित होत्या.

महिलांना आरक्षण दिले त्यामुळे राजकारणाबरोबरच विविध क्षेत्रात महिलांना काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचा महिलांनी लाभ द्यावा, असे आवाहन मान्यवरांनी केले. मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. महिलांसाठी हळद-कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. सूत्रसंचालन साहिल सैयद व शंकर नागपुरे यांनी केले. कार्यक्रमासाठी रंजिता आगदारी, अलका पचारे, पद्मा रेड्डी, यास्मिन सैयद, संगीता बोबडे, विजया बंडीवार, पद्मा त्रिवेणी, सीताबाई हिकरे, गीता सोदारी, पुष्पा नक्षीणे, अमिना बेगम, दुर्गा पाटील, संध्या मंडल, रिजवाना शेख, निलोफर शेख, माधुरी ठाकरे, सरिता गोहोकर, अर्चना सरोकार, कांचन बहुराशी, वनिता रुद्रारप, रेखा रेंगुंडवार यांनी सहकार्य केले.

Web Title: Srishakti's Awakening Women's Meeting in Ghughhus