श्रीनिवास किसान पेट्रोल पंपाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 22:52 IST2018-09-09T22:52:01+5:302018-09-09T22:52:24+5:30

माथरा येथील श्रीनिवास किसान पेटोल पंपाला रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत पेटोल पंपाच्या एका युनिटची मशिन जळून खाक झाला आहे.

Srinivas Kisan Petrol Pumpala Fire | श्रीनिवास किसान पेट्रोल पंपाला आग

श्रीनिवास किसान पेट्रोल पंपाला आग

लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : माथरा येथील श्रीनिवास किसान पेटोल पंपाला रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत पेटोल पंपाच्या एका युनिटची मशिन जळून खाक झाला आहे.
राजुरा तालुक्यातील माथरा येथे विनायक देशमुख यांच्या मालकीचे श्रीनिवास किसान सेवा पेटोल पंप आहे. या पंपाला रविवारी दुपारी १२ वाजताचे सुंमारास अचानक आग लागली. माथरा येथील सरपंच लहुजी चहारे यांनी घटनेची माहिती तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांना दिली. त्यांनी राजुरा नगरपरिषद व मानिकगड सिमेंट कंपनीला यासंदर्भात कळविले. त्यानंतर सास्ती वेकोलिचे सुनिल काळे यांच्या मार्गदर्शनात अग्निशमन दल दाखल झाला. जवानांनी आग विझविला. पण आगीत पेटोल पंपाच्या एका युनिटची मशीन खाक झाली. अग्निशमन दलाच्या सहाय्याने आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Web Title: Srinivas Kisan Petrol Pumpala Fire