फवारणीतून विषबाधा; शेतमजूर युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 22:38 IST2018-11-09T22:37:57+5:302018-11-09T22:38:14+5:30
शेतात फवारणी करताना विषबाधा होऊन शेतमजूर युवकाचा उपचारादरम्यान गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयात शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास मृत्यू झाला.

फवारणीतून विषबाधा; शेतमजूर युवकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
सावली : शेतात फवारणी करताना विषबाधा होऊन शेतमजूर युवकाचा उपचारादरम्यान गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयात शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. खुशाल लहानु देशमुख (२४) असे मृतक युवकाचे नाव आहे. खुशालच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने कीटकनाशक फवारणीसाठी रोजंदारीने जात होता. दरम्यान दोन दिवसांपूर्वी त्याची प्रकृती बिघडली. येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले. प्रकृती पुन्हा बिघडली. गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.