बल्लारपुरात धूर फवारणी करा

By Admin | Updated: August 28, 2016 00:39 IST2016-08-28T00:39:48+5:302016-08-28T00:39:48+5:30

येथील नगर पालिकेच्या अनेक वार्डात घाण निर्माण झाली आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

Spray the smoke in Ballarpur | बल्लारपुरात धूर फवारणी करा

बल्लारपुरात धूर फवारणी करा

मुख्याधिकाऱ्यांना निवेदन : भारिप-बमसंची मागणी
बल्लारपूर : येथील नगर पालिकेच्या अनेक वार्डात घाण निर्माण झाली आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अनेकांना मलेरिया व विषमज्वर आजाराने ग्रासले आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहरात धूरळणी, फवारणी करण्याची मागणी मुख्याधिकारी विपीन मुद्दा यांना दिलेल्या निवेदनातून भारिप-बहुजन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
बल्लारपूर शहरात एकूण ३२ वार्ड असून अनेक वॉर्डात स्वच्छतेअभावी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. घाणीमुळे डासांची उत्पत्ती वाढली. त्यामुळे शहरातील काही भागात मोठ्या प्रमाणात मलेरियाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. दूषित पाण्यामुळे विषमज्वराचे रुग्णही वाढले आहेत. शहरात तापसदृश आजाराचे प्रमाण वाढले आहे. उपचारासाठी रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. दवाखान्यात रुग्णांच्या रांगा दिसून येतात. त्यामुळे रुग्णांना आर्थिक भार सहन करावा लागतो. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात धूरळणी, फवारणी करण्याची मागणी भारिप बहुजन महासंघ युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत झामरे यांनी केली आहे.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी विपीन मुद्धा यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात भारिप बहुजन महासंघाचे प्रशांत मेश्राम, नरेंद्र सोनारकर, अविनाश शेंडे, सूरज चौबे, आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Spray the smoke in Ballarpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.