डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:18 IST2021-07-23T04:18:06+5:302021-07-23T04:18:06+5:30

मागील दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, जीवन विस्कळीत झाले होते. आता काही प्रमाणात का होईना कोरोनाचा प्रादुर्भाव कमी ...

Spray to prevent the spread of dengue | डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी करा

डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी करा

मागील दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, जीवन विस्कळीत झाले होते. आता काही प्रमाणात का होईना कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे; परंतु चिमूर तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण अतिशय मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. डेंग्यूमुळे बालकांपासून वृद्धांपर्यंत याचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे आरोग्य विभागावर अतिशय मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. हा ताण कमी करण्यासाठी व डेंग्यूचे रुग्ण वाढू नयेत, म्हणून ग्रामपंचायतीमार्फत प्रत्येक गावात धुरळणी व फवारणी करण्याचे निर्देश मंगळवारी झालेल्या मासिक सभेत पंचायत समिती उपसभापती रोशन ढोक यांनी गटविकास अधिकारी व आरोग्य विभागाला दिलेले आहेत. ही फवारणी आठवड्यातून एकदा करण्यात यावी व त्याचा पाठपुरावा पंचायत समितीने तात्काळ घ्यावा, तसेच ज्या ग्रामपंचायतीमार्फत फवारणी व धुरळणी करण्यात आली नाही, अशा ग्रामसेवकावर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Web Title: Spray to prevent the spread of dengue