कोरपना येथील क्रीडा संकुल अपूर्णावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:26 IST2021-03-15T04:26:00+5:302021-03-15T04:26:00+5:30

कोरपना : येथील तालुका क्रीडा संकुलाचे काम अद्यापही पूर्ण न झाल्याने अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्यात ...

The sports complex at Korpana is in a state of disrepair | कोरपना येथील क्रीडा संकुल अपूर्णावस्थेत

कोरपना येथील क्रीडा संकुल अपूर्णावस्थेत

कोरपना : येथील तालुका क्रीडा संकुलाचे काम अद्यापही पूर्ण न झाल्याने अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी क्रीडाप्रेमींकडून होत आहे.

सद्य:स्थितीत क्रीडा संकुल येथे पिण्याच्या पाण्याची, विद्युत सोय आदींचा प्रामुख्याने अभाव आहे. तसेच क्रीडा संकुलाची इमारत ही देखभाल व दुरुस्तीअभावी अडगळीत पडली आहे. या इमारतीतील दरवाजे, खिडक्या, शौचालय आदींची देखरेखीअभावी नासधूस झाली आहे. या इमारत व संकुल परिसरात तळीरामांचा मोठ्या प्रमाणात वावर राहत असल्याने मद्यप्राशनाचे केंद्र बनले आहे. क्रीडा संकुलाच्या मैदानावर झुडपे वाढल्याने सर्वत्र अस्वच्छता दिसून येते. विविध खेळांची मैदाने व क्रीडा साहित्य उपलब्ध नसल्याने क्रीडाप्रेमींचा हिरमोड होत आहे. या क्रीडा संकुलाकडे जिल्हा क्रीडा विभागाने लक्ष पुरवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: The sports complex at Korpana is in a state of disrepair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.