क्रीडा संकुल की कोंडवाडा ?
By Admin | Updated: May 13, 2015 00:07 IST2015-05-13T00:07:57+5:302015-05-13T00:07:57+5:30
लाखो रुपये खर्च करून मूल येथे तालुका क्रीडा संकुलाची इमारत बांधण्यात आली.

क्रीडा संकुल की कोंडवाडा ?
मूल : लाखो रुपये खर्च करून मूल येथे तालुका क्रीडा संकुलाची इमारत बांधण्यात आली. तसेच परिसरातील क्रीडा संकुलात रस्ते व इतर सुविधा पुरविण्यासाठी लाखो रुपयांचे अनुदान प्राप्त झाले. मात्र अनेक सुविधांचा अभाव पदोपदी जाणवत आहे. एखाद्या समारंभासाठी क्रीडा संकुलाचा वापर केल्यानंतर तत्काळ साफ-सफाई होणे गरजेचे असते. मात्र मूल येथील क्रीडांगणावर उष्टे फेकलेले अन्न पडून राहते. त्यामुळे डुकरे, कुत्रे व जनावरांचा येथे सातत्याने धुमाकूळ सुरू असतो. येथील चित्र पाहताच क्रीडा संकूल की, कोंडवाडा असा प्रश्न उपस्थित होतो.
येथे जागोजागी दारुच्या बाटल्या पडून आहेत. काही बॉटल फुटून मैदानात काचा विखरल्या आहेत. हेकाचे पडल्याने लोकांना त्रासदायक ठरत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी नगरसेवक प्रभाकर भोयर व इतर नागरिकांनी केली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुका क्रीडा संकुलनात लाखो रुपयांची अद्यावत साधने धुळखात पडली आहेत. ती साधने नेहमी कुलूप बंद असल्याने युवकांना त्यापासून वंचीत व्हावे लागत आहे. नव्याने रनींग ट्रॅक बनविण्यात येत आहे. मात्र बराच कालावधी लोटत असताना ते अपूर्ण अवस्थेत आहे. रेतीच्या ढिगाऱ्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. एखाद्या समारंभासाठी क्रिडासंकुल दिल्यानंतर लागलीच स्वच्छता केली पाहिजे. मात्र स्वच्छता न केल्याने उष्ट्या अन्नावर डुकरे, कुत्रे व जनावरे तुटून पडतात. त्यामुळे क्रिडांगणावर जनावरांचा हौदोस वाढल्याचे दिसून येते. समारंभाला क्रीडा संकुलन दिल्यानंतर दारूबंदी असताना दारू पिणे व दारूच्या बाटल्या फोडने हा प्रकार अशोभणीय असून याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची मागणी नगरसेवक प्रभाकर भोयर व इतर नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)