शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

लोकमत रक्तदान महायज्ञाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 05:00 IST

सामाजिक, सांस्कृतिक, तसेच आरोग्य क्षेत्रातील रक्तदात्यांनी रक्तदान करून ‘लोकमत रक्ताचं नातं’ या  राष्ट्रीय मोहिमेत सहभाग नोंदविला. लोकमत वृत्तपत्र समूहाच्या पुढाकारात जिल्हा सामान्य रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर, इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन रेडक्राॅस सोसायटी, तसेच सोमय्या पाॅलिटेक्निक चंद्रपूरच्या संयुक्त विद्यमाने रक्तदानाच्या या महायज्ञाचा प्रारंभ करण्यात आला. 

ठळक मुद्देजिल्हाभर रक्तदान शिबिर : डाॅक्टरांसह सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचेही रक्तदान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक व स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्ताने ‘‌लोकमत रक्ताचं नातं’ ही रक्तदानाची भव्य मोहीम राज्यभरात हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत शुक्रवारी स्थानिक आयएमए सभागृहात रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सामाजिक, सांस्कृतिक, तसेच आरोग्य क्षेत्रातील रक्तदात्यांनी रक्तदान करून ‘लोकमत रक्ताचं नातं’ या  राष्ट्रीय मोहिमेत सहभाग नोंदविला. लोकमत वृत्तपत्र समूहाच्या पुढाकारात जिल्हा सामान्य रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर, इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन रेडक्राॅस सोसायटी, तसेच सोमय्या पाॅलिटेक्निक चंद्रपूरच्या संयुक्त विद्यमाने रक्तदानाच्या या महायज्ञाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार किशोर जोरगेवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे, आयएमएचे अध्यक्ष डाॅ. मंगेश गुलवाडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. अविनाश टेकाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. राजकुमार गहलोत,  रक्त संक्रमण अधिकारी डाॅ. अनंत हजारे, आयएमएचचे सचिव डाॅ. अनुप पालिवाल, लघु न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा उपसंचालक डाॅ. मनोज भांडारकर, लोकमत परिवारातील ज्येष्ठ सदस्य डाॅ. अशोक बोथरा,  जलबिरादरीचे संयोजक संजय वैद्य, डॉ. किरण देशपांडे, लोकमत विक्रेते रमन बोथरा, लोकमत  शाखा व्यवस्थापक विनोद बुले, लोकमत जिल्हा प्रतिनिधी राजेश भोजेकर, लोकमत समाचार जिल्हा प्रतिनिधी अरुणकुमार सहाय उपस्थिती होती.आयएमएचे अध्यक्ष डाॅ. मंगेश गुलवाडे यांनी चांगल्या कामासाठी एकत्र आलोत. कोरोना काळात रक्तदान शिबिराद्वारे सामाजिक कार्यात प्रत्येकांनी हातभार लावण्याचे आवाहन केले. जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. निवृत्ती राठोड म्हणाले, ‘लोकमत’ने हाती घेतलेला उपक्रम सामाजिक हिताचा आहे. राज्यभर रक्तदान शिबिर आयोजित करून नवा आदर्श निर्माण केला. जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत म्हणाले, लोकहितासाठी रक्तदान शिबिराची चळवळ हातात घेतली आहे. देशसेवेसाठी प्रत्येकांनी रक्तदान करावे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे यांनी लोकमतने राज्यात रक्ताची गरज लक्षात घेत हा उपक्रम सुरू केला. यातून गरजूंना त्वरित रक्त मिळणार असून रुग्णांचा जीव वाचणार असल्याचे सांगितले. लोकमत शाखा व्यवस्थापक विनोद बुले यांनी संचालन तर लोकमत जिल्हा प्रतिनिधी राजेश भोजेकर यांनी प्रास्ताविक केले. सोनम मडावी यांनी आभार मानले.

चंद्रपूर जिल्हा सामाजिक भान असलेला जिल्हा आहे. सामाजिक कार्यात नागरिक प्रत्येक कामात अग्रेसर आहे. लोकमत वेळोवेळी लोकोपयोगी उपक्रम राबवीत असून, चांगल्या कामाची नेहमी दखल घेत आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. रक्तदान महायज्ञाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी कार्यक्रमाप्रसंगी केले.

बल्लारपूर येथे आज रक्तदान शिबिरबल्लारपूर येथे आज सकाळी १० ते २ वाजेपर्यंत ग्रामीण रुग्णालय सभागृहात रक्तदान शिबिर होणार आहे. यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र, लॅपटाॅप बॅग देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी वसंत खेडेकर ९९२२९३०३५, मंगल जिवने ९९२२९३०१४९, राजेश खेडेकर ९९२२४१२५५४, किरण दुधे ९२२६७४७६२००, सुभाष भटवलकर ९६०४६५२४५० येथे संपर्क साधावा.

 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंट