नारंडा येथे कोरोना लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:26 IST2021-04-18T04:26:48+5:302021-04-18T04:26:48+5:30
कोरपना : तालुक्यातील नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील आतापर्यंत जवळपास दोन हजारांच्या ...

नारंडा येथे कोरोना लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
कोरपना : तालुक्यातील नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील आतापर्यंत जवळपास दोन हजारांच्या वर नागरिकांचे कोरोना लसीकरण झालेले आहे.
या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल टेंभे यांच्या मार्गदर्शनात अतिशय उत्तमपणे कोरोना लसीकरणाचे सुरू आहे. ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्यात येत आहे. तालुक्यातील सर्वाधिक कोरोना लसीकरण हे नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेले आहे.
यावेळी नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाची भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी पाहणी केली. यावेळी लसीकरणाकरिता तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
कोरपना तालुका हा आदिवासीबहुल व ग्रामीण भागाने व्यापलेला असूनसुद्धा या आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण हे दोन हजारांच्या वर गेलेले आहे. यासाठी या आरोग्य केंद्रात यंत्रणा हे अतिशय उत्तम कार्य करीत आहे. सध्या दररोज दोनशे नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी न घाबरता कोरोनाचे लसीकरण करून घ्यावे व लसीकरण केल्याने प्रकृतीसंदर्भात कोणतीही समस्या उद्भवणार नाही. नागरिकांनी सोबत येताना आधार कार्ड व आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल क्रमांक सोबत आणावा, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. टेंभे यांनी केले आहे.