भरधाव वाहनांवर स्पीडलेसर बसविणार अंकुश

By Admin | Updated: October 28, 2015 01:13 IST2015-10-28T01:13:35+5:302015-10-28T01:13:35+5:30

नियमांचे उल्लंघन करून भरधाव वाहने चालविणाऱ्या चारचाकी, दुचाकी वाहनांची गती मोजणारे स्पीडलेसर नावाचे यंत्र वाहतूक पोलिसांच्या दिमतीला आले आहे.

Speedless driver will not be able to drive speedlaser | भरधाव वाहनांवर स्पीडलेसर बसविणार अंकुश

भरधाव वाहनांवर स्पीडलेसर बसविणार अंकुश

नवे उपकरण आले : कडक अंमलबजावणी होणार
चंद्रपूर : नियमांचे उल्लंघन करून भरधाव वाहने चालविणाऱ्या चारचाकी, दुचाकी वाहनांची गती मोजणारे स्पीडलेसर नावाचे यंत्र वाहतूक पोलिसांच्या दिमतीला आले आहे. यामुळे चंद्रपूर शहरातून आणि राज्य मार्गावरून भरधाव धावणाऱ्या वाहनांवर चाप बसणार आहे.
चंद्रपूर शहराकडे येणारा वाहनांचा लोंढा आणि वेगमर्यांदेचे उल्लंघन करून धावणारी वाहने ही वाहतूक पोलिसांसाठी नेहमीच डोकेदुखी ठरली आहे. यातून भर शहरात आणि राज्य मार्गावर अनेकदा अपघात घडले आहेत. हा प्रकार रोखण्यासाठी स्पीडलेसर हे नवे उपकरण चंद्रपूर वाहतूक पोलिसांना जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाने उपलब्ध करून दिले आहे. चार स्पीडलेसरची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. त्यापैकी सध्या एकच उपकरण प्राप्त झाले आहे. व्हिडीओ कॅमेऱ्यासारखे वाटणारे हे उपकरण असून ते कुठेही स्टँडवर लावता येते. त्याला बराच काळपर्यंत चालणारी बॅटरी जोडण्यात आली असून कुणालाही सहज हाताळता येईल, असे हे उपकरण आहे. यात १५० मीटर लांब अंतरावरील वाहनाचा वेग मोजण्याची आणि नोंदविण्याची व्यवस्था आहे. या सोबतच छायाचित्रे, व्हिडीओ शुटींगही यात घेतले जाऊ शकते. वाहनाचा वेग, नोंदीची वेळ, वाहनाचा क्रमांक आदी बाबींच्या प्रिंट काढण्याचीही व्यवस्था यात आहे. हयगयीने आणि बेजबाबदारपणे तसेच वेगमर्यादेचे उल्लंघन करून वाहन चालविल्याबद्दल कायद्यात दंडाची तरतुद आहे. तरीही बरेचदा पुराव्याअभावी अरोपी निर्दोष सुटतात. मात्र या उपकरणामुळे या सर्व अडचणीवर उत्तर सापडले आहे. शहरातील वाहतुकीसंदर्भात माहिती देताना चंद्रपूर शहर वाहतूक पोलीस निरीक्षक अशोक कोळी म्हणाले, आपण रूजू झाल्यापासून गेल्या महिनाभराच्या काळात वाहतूक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ५ हजार ५०० दुचाकी आणि चारचाकी वाहनांविरोधात कारवाई केली आहे. ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असून कर्कश हॉर्न, फॅन्सी नंबर प्लेट, स्टंटबाजी करणाऱ्या वाहनाच्या आणि चालकांच्या विरोधातही अशीच कारवाई केली जाणार असल्याचे संकेत दिले. छोटा बाजार परिसरातील सिग्नल पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू असून जटपुरा गेटवर वाहतुकीचा पडणारा रेटा रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Speedless driver will not be able to drive speedlaser

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.