सर्व नवीन बसस्थानकांच्या कामाला गती द्यावी
By Admin | Updated: August 7, 2016 00:40 IST2016-08-07T00:40:50+5:302016-08-07T00:40:50+5:30
जिल्ह्यातील सर्व नवीन बसस्थानकांच्या कामाला गती देण्यात यावी. तसेच त्यांची रचना निश्चित करताना ...

सर्व नवीन बसस्थानकांच्या कामाला गती द्यावी
सुधीर मुनगंटीवार : बस आनंदाचे साधन व्हावे
चंद्रपूर : जिल्ह्यातील सर्व नवीन बसस्थानकांच्या कामाला गती देण्यात यावी. तसेच त्यांची रचना निश्चित करताना जिल्ह्याचा इतिहास, तेथील वैशिष्ये विचारात घेऊन उत्तम डिझाईन्स तयार केली जावीत, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
या संदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख, आमदार संजय धोटे, बंटी भांगडिया, नाना शामकुळे, परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर आणि ताडोबा यांचे अतूट नाते आहे. त्यामुळे येथील बसस्थानकाची नवीन रचना करताना ताडोबाची वैशिष्ट्ये विचारात घेऊन ती केली जावी. बस हे प्रवासाचे आनंदाचे साधन झाले पाहिजे. यासाठी एक चांगले नियोजन करण्यात यावे. एस.टी आणि स्थानक विकासात भांडवली गुंतवणूक करताना करण्यात येणारे काम हे उत्तम दर्जाचेच झाले पाहिजे, याकडे लक्ष द्यावे. बैठकीत मुनगंटीवार यांनी बल्लारपूर, मूल, चंद्रपूर, पोंभूर्णा, कोरपना, गडचांदूर, नागभीड, चिमूर या सर्व बसस्थानकांच्या विकासाचा आढावा घेतला. (शहर प्रतिनिधी)