विशेष जिल्हासभेत ठराव पारित

By Admin | Updated: August 9, 2015 01:11 IST2015-08-09T01:11:08+5:302015-08-09T01:11:08+5:30

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीची जिल्हा कार्यकारिणी सभा स्थानिक जटपुरा गेट प्राथमिक शाळेत पार पडली.

Special resolution passed the assembly | विशेष जिल्हासभेत ठराव पारित

विशेष जिल्हासभेत ठराव पारित

चंद्रपूर : महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीची जिल्हा कार्यकारिणी सभा स्थानिक जटपुरा गेट प्राथमिक शाळेत पार पडली.
सभेला जिल्ह्यातील १५ तालुक्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्व तालुका पदाधिकाऱ्यांनी एकमताने जिल्हाध्यक्ष विजय भोगेकर यांच्यावर विश्वास व्यक्त केला. संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षक पाठीशी असल्यामुळे काही निष्कासित बंडखोरांनी चालवलेली केविलवाणी धडपड आता बंद पडणार आहे.
संघटनेतून निष्कासीत काही बंडखोरांनी वरोरा येथे सभा लावली होती. मात्र सभेला झुगारून सर्व तालुक्यांनी आजच्या सभेला उपस्थिती दर्शवली. यावेळी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी भावना व्यक्त केल्या. संघटनेचे संस्थापक सदस्य आर.जी. भानारकर यांचे व मागील २० वर्षांपासून जिल्ह्याच्या विविध पदावर सक्षमपणे कार्य करून प्राथमिक शिक्षकांना न्याय देणारे विजय भोगेकर यांच्या प्रयत्नामुळेच संघटना प्रत्येक शिक्षकांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळेच सर्वांनी विजय भोगेकर यांच्या नेतृत्वात पुढे जायचे असे या सभेत ठरविण्यात आले. सभेला विभागीय अध्यक्ष नारायण कांबळे, राज्य महिला उपाध्यक्षा चंदा खांडरे, जिल्हा पदाधिकारी दिलीप इटनकर, हेमंत वाग्दरकर, सुभाष अडवे, दीपक वऱ्हेकर, पी.टी. राठोड, हरीश ससनकर, शालिनी देशपांडे, प्रतिभा उदापुरे, दुष्यंत मत्ते, सुनीता इटनकर, तालुका पदाधिकारी रामभाऊ दुभोरे आदी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Special resolution passed the assembly