शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानचा यू-टर्न, आता युद्धविरामचे श्रेय दिले चीनला; आधी ट्रम्प यांना दिलेले
2
मुख्यमंत्र्यांचा फोन येताच उमेदवारी घेतली मागे! बंडखोरी रोखण्यात भाजपला यश; उद्धवसेना मात्र अपयशी
3
नेपाळमध्ये काळजाचा ठोका चुकला! ५५ प्रवाशांना घेऊन उतरणारे विमान धावपट्टीवरून घसरले
4
तब्बल ६६ नगरसेवक बिनविरोध; भाजपचे सर्वाधिक ४३, शिंदेसेनेचे १९; ...तर आयोग करणार तपास
5
मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ जानेवारी २०२६ : दिवस अत्यंत आनंददायी, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल!
7
सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून
8
बिनविरोधचे हसू अन् बंडखोरीचे आसू; महामुंबईतील मोजके बंडखोरही सत्ताधाऱ्यांचेच; अनेकांनी घेतली माघार
9
राज्यात फक्त अन् फक्त मराठीच सक्तीची! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी स्पष्टोक्ती  
10
धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 
11
मराठी दलित साहित्य हा भारतीय साहित्यविश्वाचा आधारस्तंभ - मृदुला गर्ग  
12
मराठी शाळा टिकव्यात, इथेच ज्ञानेश्वर-तुकोबा घडतील; विश्वास पाटील यांचे प्रशासकीय उदासीनतेवर बोट
13
कृतिशील, निर्मितीशील असणे हेच जीवनाचे इतिवृत्त - तारा भवाळकर
14
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
15
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
16
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
17
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
18
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
19
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
20
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
Daily Top 2Weekly Top 5

मानव-वन्यजीव संघर्ष टाळताना अधिकारी-नागरिकांमध्ये संघर्षाची ठिणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 05:00 IST

शासनाने विशेष चमू तयार करून अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे. ब्रह्मपुरी वनविभागाचा विस्तार फार मोठा आहे. जवळपास ११४ वाघ, ११० बिबट यासह हरीण, काळवीट, सांबर, चितळ, मोर, राणगवा, अस्वल आदी वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. मानव - वन्यजीव संघर्ष ही नित्याचीच बाब आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी वनविभागाला संरक्षित क्षेत्र घोषित करुन पर्यटन क्षेत्र निर्माण करण्याची मागणी आहे.

दत्तात्रय दलाललोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : मानव-वन्यजीव संघर्ष थांबविण्यासाठी ब्रह्मपुरी वनविभागाला संरक्षित क्षेत्र घोषित करून इको-टुरिझम निर्माण करण्यात येणार आहे. यासोबतच विविध योजना राबवून जंगलव्याप्त गावांचा विकास करण्यात येणार आहे. गरजेपोटी काहींनी तर काहींनी मुद्दाम जंगलव्याप्त भागात अतिक्रमण करुन शेती केली आहे. हे अतिक्रमण काढणे वनविभागाला जिकिरीचे ठरणार आहे. अतिक्रमण काढताना अधिकारी व नागरिक असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. शासनाने विशेष चमू तयार करून अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे. ब्रह्मपुरी वनविभागाचा विस्तार फार मोठा आहे. जवळपास ११४ वाघ, ११० बिबट यासह हरीण, काळवीट, सांबर, चितळ, मोर, राणगवा, अस्वल आदी वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. मानव - वन्यजीव संघर्ष ही नित्याचीच बाब आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी वनविभागाला संरक्षित क्षेत्र घोषित करुन पर्यटन क्षेत्र निर्माण करण्याची मागणी आहे. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते.  वृत्ताची दखल घेत मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी इको - टुरिझम निर्माण करण्यासाठी विशेष सभा घेतली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर प्रस्ताव नुकताच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात या परिसराचा कायापालट होणार आहे. यासाठी अतिक्रमण काढणे अत्यावश्यक ठरणार आहे. वनविभाग कारवाई करत असताना स्थानिक नागरिक व वनविभागाचे अधिकारी असा संघर्ष निर्माण होऊ शकतो

जंगलव्याप्त भागात जनजागृती करणे आवश्यकजंगलव्याप्त भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांची जनजागृती करुन जंगलालगतची शेती नागरिकांनी करु नये. यासाठी दहा हजार रुपयांचा निधी शासनाकडून देण्यात येणार असल्याचे मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे जीवावर उदार होऊन ही शेती करु नये. यासाठी जनजागृती करण्यात यावी. तेव्हाच मानव - वन्यजीव संघर्ष कमी होण्यास मोलाचे सहकार्य नागरिकांकडून मिळण्यास मदत होऊ शकेल.

 

टॅग्स :forest departmentवनविभागEnchroachmentअतिक्रमण