गांगलवाडी भागात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
By Admin | Updated: June 23, 2017 00:40 IST2017-06-23T00:40:55+5:302017-06-23T00:40:55+5:30
पावसाळ्याला सुरुवात होऊन जवळपास एक महिना लोटत असूनदेखील या भागात पावसाने हजेरी लावली नाही.

गांगलवाडी भागात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
गांगलवाडी : पावसाळ्याला सुरुवात होऊन जवळपास एक महिना लोटत असूनदेखील या भागात पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी चिंतातूर झाले आहेत. या भागातील सर्वच शेतकरी भात उत्पादक असून पावसाची मोठ्या प्रमाणात गरज असते.
या भागातील गांगलवाडी, तळोधी, बरडकिन्ही, गोगाव, मुई, बेलपातळी या गावामध्ये पेरणी योग्य पाऊस न झाल्यामुळे येथील सर्वच शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.
या भागातील ९० टक्के शेतकरी वर पावण्यावर अवलंबून असल्यामुळे शेतीच्या हंगामाला उशीर होत आहे. या भागात पाऊस येणार किंवा नाही व पेरण्या होती की काय या विवंचणेत शेतकरी वर्ग सापडला आहे.
या भागातील शेतकऱ्यांनी पेरणी साठी महागडी बिजाई घेवून ठेवली असून पावसाअभवी पेरीणला विलंब होत असलञयामुळे या भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाला असून त्यांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे.