शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीचा पोत व पाण्याचा समतोल साधूनच पेरणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:01 IST

मध्यम कालावधीच्या धान पिकाची लागवड केल्यास धानपीक १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत काढणीस येते. शेतकऱ्यांनी खरीप हंगामाकरिता कमी व मध्यम कालावधीच्या बियाण्याची लागवड केल्यास अपेक्षित उत्पन्न वाढून रब्बी पिकांच्या उत्पादनात वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मध्यम कालावधीचे बियाणे फायदेशीर ठरते.

ठळक मुद्देउत्पन्न वाढीसाठी प्रयत्न : शेतकऱ्यांना कृषी विभागाचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: चंद्रपूर जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे अधिकाधिक उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी कमी आणि मध्यम कालावधीचे म्हणजेच १२० ते १२५ दिवसाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या वाणाची लागवड करावी तसेच जमिनीचा व पाण्याचा समतोल साधून शेतकऱ्यांनी पेरणी करीत आपले आर्थिक उत्पन्न वाढवावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. शेतरी सध्या खरीप हंगामाची तयारी करीत आहे. त्यामुळे कृषी विभागाने तालुकापातळीवर जनजागृती सुरू केली आहे.मध्यम कालावधीच्या धान पिकाची लागवड केल्यास धानपीक १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत काढणीस येते. शेतकऱ्यांनी खरीप हंगामाकरिता कमी व मध्यम कालावधीच्या बियाण्याची लागवड केल्यास अपेक्षित उत्पन्न वाढून रब्बी पिकांच्या उत्पादनात वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मध्यम कालावधीचे बियाणे फायदेशीर ठरते. ऑक्टोबर महिन्यात जमिनीत जास्त ओलावा राहत असल्याने रब्बी पिकाच्या उत्पन्नात देखील चांगली वाढ होते. धानपीक लागवड करताना श्री पद्धत, सगुना व पट्टा पद्धतीचा अवलंब करावा. भात पिकासोबतच शेतकऱ्यांनी खरीप हंगामात तूर, सोयाबिन, मका, कापूस, मुंग, उडीद अशा पिकांची लागवड केल्यास जमिनीचा पोत सुधारुन शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होते. शेतकऱ्यांनी घरच्याघरी बीज प्रक्रिया करुन बियाणे खरेदीसाठी होणाऱ्या खर्चात बचत करावी, बियाणे खरेदीचा खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकाच्या मार्गदर्शनात तीन टक्के मिठाच्या द्रावणाची व बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया ही भातपिकासाठी करावी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. यासाठी कृषी सहायकांमार्फत मागदर्शन केले जात आहे. गावातील नोंदणीकृत गटामार्फत शेतकऱ्यांना एकत्रित खतांची व पाण्याची एकत्रित मागणी केल्यास शेतकऱ्यांना कृषी केंद्र व शेतकरी बचत गटामार्फत बियाणे पोहचविले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य बियाणांची लागवड करावी, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.बियाणे खरेदी करताना काळजी घ्याकोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळामध्ये उद्याची आवश्यकता काय, हे बघून पिकाची पद्धत ठरवावी, सोबतच आपली कौटुंबिक परिस्थिती जमिनीची पत आणि उपलब्ध मनुष्यबळाचा विचार देखील यासाठी व्हावा, अशा सूचना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील यांनी शेतकऱ्यांना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी परवाना धारक बियाणे विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करणे गरजेचे आहे. खरेदी केलेल्या बियाण्याबाबत संपूर्ण तपशिल असलेले उदा. पिक वाण, लेबल, नंबर,परवाना तपासणीचा दिनांक, मुदत, बियाणे किंमत, खरेदीदारांचे उत्पादकाचे, विक्रेत्यांचे नाव तसेच विक्रेत्यांची सही, रोखी अथवा उधारीची पावती घ्यावी.

टॅग्स :agricultureशेती