मराठी अध्यापक सारस्वताचा स्रोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 06:00 IST2020-01-13T06:00:00+5:302020-01-13T06:00:24+5:30

मराठी भाषेचा अभिमान बाळगत असताना अध्यापकांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, बा.सी.मर्ढेकर या मराठीतील मर्मबंधातील ठेवींमध्ये समरस होऊन त्यात पारंगत होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. मराठी भाषेचे अध्यापक हे साहित्य सारस्वताचा स्रोत असल्याचे गौरवोद्गार यावेळी प्रा. वसंत पुरके यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना विजय लांडगे म्हणाले, मराठी शिक्षकांनी पराभूत मानसिकता न जोपासता सकारात्मक दृष्टीकोन ठेवला पाहिजे.

Source of Marathi Teacher Essence | मराठी अध्यापक सारस्वताचा स्रोत

मराठी अध्यापक सारस्वताचा स्रोत

ठळक मुद्देवसंत पुरके : राज्यस्तरीय मराठी शिक्षक कृतिसत्राचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : शैक्षणिक वातावरण, परिणामकारक अध्यापन कौशल्य, सर्जनशिल, सृजनात्मक आणि सकारात्मक दृष्टीकोन असेल तर दर्जेदार मराठी शिक्षण व भाषेची भरभराट कुणीही थांबवू शकत नसल्याचे प्रतिपादन माजी शालेय शिक्षणमंत्री प्रा.वसंत पुरके यांनी केले.
राजुरा येथील दोन दिवशीय ३९ व्या राज्यस्तरीय मराठी शिक्षकांच्या कृतिसत्राच्या समारोप कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक संघाचे राज्याचे अध्यक्ष विजयकुमार लांडगे होते. माजी आमदार सुदर्शन निमकर, बा.ग.यादव, विरा राठोड, भरत गावडे, दीपक दोंदल, ज्ञानेश्वर शिरभैये, राजु डाहुले, मीरा जोशी, रजनी शर्मा, केवाराम डांगे, सुभाष शेंडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रा.वसंत पुरके आपले विचार व्यक्त करताना मातृभाषेकडे आपली पावले नकळत वळत असली तरी भाषा संकराशिवाय कुठलीही भाषा समृध्द होत नसल्याचा मुद्दा मांडला.
मराठी भाषेचा अभिमान बाळगत असताना अध्यापकांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, बा.सी.मर्ढेकर या मराठीतील मर्मबंधातील ठेवींमध्ये समरस होऊन त्यात पारंगत होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. मराठी भाषेचे अध्यापक हे साहित्य सारस्वताचा स्रोत असल्याचे गौरवोद्गार यावेळी प्रा. वसंत पुरके यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना विजय लांडगे म्हणाले, मराठी शिक्षकांनी पराभूत मानसिकता न जोपासता सकारात्मक दृष्टीकोन ठेवला पाहिजे. यातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होणार असल्याचे मत मांडले. या कार्यक्रमात अल्का सदावर्त व स्वरप्रिती अकादमीच्या कलाकारांनी सुंदर स्वागतगित व मराठीगीत सादर केले.

Web Title: Source of Marathi Teacher Essence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.