गोंडपिपरी रुग्णालयात येणार सोनोग्राफी मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:16 AM2021-03-29T04:16:01+5:302021-03-29T04:16:01+5:30

गोरगरीब रुग्णांचेही योग्य वेळेवर निदान होणार आहे. अत्यंत मागास व नक्षलग्रस्त असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील नागरिकांना सामान्य आजारावरील उपचारासाठी ६५ ...

Sonography machine will come to Gondpipri Hospital | गोंडपिपरी रुग्णालयात येणार सोनोग्राफी मशीन

गोंडपिपरी रुग्णालयात येणार सोनोग्राफी मशीन

googlenewsNext

गोरगरीब रुग्णांचेही योग्य वेळेवर निदान होणार आहे.

अत्यंत मागास व नक्षलग्रस्त असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील नागरिकांना सामान्य आजारावरील उपचारासाठी ६५ किलोमीटर लांब असलेल्या चंद्रपूर येथे, ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे रेफर केले जात असे. तालुक्यातील गर्भवती माता-बहिणींना प्रसूतीदरम्यान क्लिष्ट परिस्थिती निर्माण झाली तर सोनाग्राफी मशीन नसल्यामुळे चंद्रपूरशिवाय पर्यायच नव्हता. जीव मुठीत घेऊन जाणाऱ्या महिलांच्या वेदना पाहवल्या जात नसत. कधीकाळी तर रस्त्यात उपचाराअभावी अनेक माता-बहिणींना जीव गमवावे लागत असत. त्यामुळे गोंडपिपरी तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे बबन निकोडे, राकेश पून, चेतनसिह गौर, अरुणा जांभूळकर यांनी आमदार मुनगंटीवार यांच्याकडे मागणी करताच त्यांनी याबाबत प्रयत्न केले. जिल्हा नियोजन समितीने गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयाला सोनोग्राफी मशीनसाठी २५ लक्ष रुपयाला प्रशासकीय मान्यता प्रदान केली असून सदर रक्कम शल्य चिकित्सकांकडे वितरित करण्यात आली आहे.

Web Title: Sonography machine will come to Gondpipri Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.