सोनेगाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:29 IST2021-04-22T04:29:18+5:302021-04-22T04:29:18+5:30
फोटो चिमूर : तालुक्यातील काग (सोनेगाव) येथे मंगळवारी काग येथील रेतीघाट लिलाव प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी, यासह अनेक ...

सोनेगाव
फोटो
चिमूर
: तालुक्यातील काग (सोनेगाव) येथे मंगळवारी काग येथील रेतीघाट लिलाव प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी, यासह अनेक मागण्यांसाठी भारतीय क्रांतिकारी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन व बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.
सन २०२१ काग सोनेगाव रेती घाट लिलाव प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी, मौजा काग (सोनेगाव) येथील रेती घाटातील रेती तस्करी करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, रेती घाट लिलाव प्रक्रियेत नियमबाह्य अधिकाराचा वापर करून झालेल्या भ्रष्टाचारात सहभागी अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, शेतकऱ्यांच्या पांदण रस्त्यावरून ओव्हरलोड रेतीची वाहतूक करीत असल्याने, झालेल्या पिकाची नुकसान भरपाई करण्यात यावी आदी मागण्या रेटून धरल्या आहेत. जोपर्यंत रेती तस्करी थांबवली जात नाही, नियमबाह्य भ्रष्ट बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होत नाही व मागण्या मान्य केल्या जाणार नाही, तोपर्यंत उपोषण सुरू राहील, असे उपोषणकर्ते कैलास भोयर, सांरग दाभेकर यांनी सांगितले. उपोषणाला भारतीय क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विन कोब्रा, उपाध्यक्ष टेरेन्स कोब्रा, नागभीड शहर उपाध्यक्ष विशाल भसारकर व स्थानिक शेतकरी, नागरिकांनी सहभाग दर्शवला.
बॉक्स
लिलावात गैरप्रकार
कैलास भोयर, सांरग दाभेकर यांनी गावातील प्रोत्साहित महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला बचत गटांना रेती घाट देण्यात यावा, यासाठी १३ ऑक्टोबर २०२० ला लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रस्ताव दाखल केला. जेणेकरून गावातील बेरोजगार महिला, पुरुषांना रोजगार मिळावा, मात्र अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे महिला गटाला डावलून खोटे कागदपत्रे जोडून अवैधरीत्या रेती घाट लिलाव करण्यात आले. याचाच अर्थ जिल्ह्यातील इतर रेती घाटांचा लिलाव अवैधरीत्या केल्याचा आरोप निवेदनात केला आहे.