डोंगरगावात वडिलांविरूद्ध मुलगा रिंगणात

By Admin | Updated: July 30, 2015 01:05 IST2015-07-30T01:05:13+5:302015-07-30T01:05:13+5:30

नागभीड तालुक्यातील ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीचे रणकंदन सुरू आहे. सारेच मोहरे इरेला पेटले आहेत.

Son against the father in Dongargaad | डोंगरगावात वडिलांविरूद्ध मुलगा रिंगणात

डोंगरगावात वडिलांविरूद्ध मुलगा रिंगणात

नागभीड : नागभीड तालुक्यातील ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीचे रणकंदन सुरू आहे. सारेच मोहरे इरेला पेटले आहेत. नाती गोती दुय्यम ठरली असून डोंगरगाव येथे चक्क वडील आणि मुलगा एकमेकांविरूद्ध उभे ठाकले आहेत.
इतर कोणत्याही बाबतीत नाही पण निवडणूक म्हटले की लोकांना एक वेगळेच स्फुरण चढते. डोंगरगाव मध्येही आजवर तेच होत आले. या गावाचा तसा पिंडच राजकीय आहे. २० वर्ष नागभीड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि २० वर्ष डोंगरगावचे सरपंच राहिलेल्या स्व. वासुदेवराव पाथोडे यांनी या गावाची जिल्ह्याच्या राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. तेच डोंगरगाव आता वडील आणि मुलामध्ये होत असलेल्या लढाईने पुन्हा चर्चेत आले आहे.
राजेश्वर सोनबा शिवणकर या व्यक्तीची गावाचा मेंबर व्हावा ही ईच्छा होती. तसे त्याने प्रयत्न चालवले. गावातील एका प्रमुख पॅनलने त्याची दखल घेतली आणि त्यांना पॅनलमध्ये सामावून घेतले. तोपर्यंत राजेश्वरचा मुलगा गुरूदेव यानेही आपला प्रचार सुरू केला होता. त्याची धडक लक्षात घेवून दुसऱ्या प्रमुख पॅनलने त्याला आपल्या पॅनलमध्ये घेतले. दोघांनीही वेगवेगळ्या पॅनलकडून नामांकन दाखल केले. नंतर एकमेकांना समजविण्याचे खुप प्रयत्न झाले पण सारेच व्यर्थ. दोघेही आपआपल्या भुमिकेवर ठाम राहिले. आता दोघांचाही प्रचार जोमात सुरू आहे. मतदार कोणाला कौल देतात, याकडे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Son against the father in Dongargaad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.