कुणी शुगर तर काहींनी करून घेतली ब्लड प्रेशर तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:17 IST2021-02-19T04:17:33+5:302021-02-19T04:17:33+5:30
तुलसीनगरात आरोग्य तपासणी : आरोग्य विभागाच्या वतीने शिबिर चंद्रपूर : येथील तुलसीनगरामध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या संयुक्त विद्यमाने ...

कुणी शुगर तर काहींनी करून घेतली ब्लड प्रेशर तपासणी
तुलसीनगरात आरोग्य तपासणी : आरोग्य विभागाच्या वतीने शिबिर
चंद्रपूर : येथील तुलसीनगरामध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुणी शुगर तर काहींनी ब्लड प्रेशर, दंतरोग, रक्त तपासणी करून घेत आरोग्याची काळजी घेतली.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गंत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले जाते. याअंतर्गत तुलशीनगरामध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक वासुदेव कुचनकार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय असंसर्गजन्य नियंत्रण कक्ष जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक डाॅ. श्वेता सावलीकर, अध्यक्षस्थानी शिवसेनेच्या माजी जिल्हा महिला संघटिका कुसूम उदार यांची उपस्थिती होती.
यावेळी डाॅ. श्वेता सावलीकर यांनी व्यसनापासून दूर राहण्याची विनंती केली. तंबाखू सेवनामुळे होणारे आजार याबाबत माहिती देऊन व्यसनापासून दूर राहिल्यास आरोग्य जपता येत असल्याचे सांगितले. तसेच आरोग्याची नियमित तपासणी करण्याचे आवाहन केले. तर शिवसेनेच्या माजी जिल्हा महिला संघटिका कुसुम उदार यांनी सामाजिक उपक्रम म्हणून आरोग्य शिबिराचे आयोजन केल्याचे सांगितले. भविष्यात नागरिकांच्या आरोग्यासाठी वेळोवेळी या प्रकारचे शिबिर राबविण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी डाॅ. अभय राठोड, अतुल शेंदरे, शंकर संगमवार, निरंजने, ममता कालकोटवार यांनी सहकार्य केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी विश्वास मालीकर,नितीन उदार, तुषार रायपुरे, मिनाश्री बोंडे, गेडाम, स्मिता उमरे, स्वातीताई, उषा गजभिये, सुरज वनकर, पायल जुजलकर, प्रणिता माथनकर, धनश्री मालिकर, माला रामटेके आदींनी परिश्रम घेतले. संचालक विश्वास मालिकर, आभार प्रतिभा तेलतुंबडे यांनी मानले.
बाॅक्स