माध्यमिक शाळांच्या समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:24 IST2021-03-07T04:24:19+5:302021-03-07T04:24:19+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यातील माध्यमिक शाळातील प्रलंबित असलेल्या शैक्षणिक समस्या सोडवा, शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण तूर्त स्थगित करा, वरिष्ठ व निवड ...

Solve secondary school problems | माध्यमिक शाळांच्या समस्या सोडवा

माध्यमिक शाळांच्या समस्या सोडवा

चंद्रपूर : जिल्ह्यातील माध्यमिक शाळातील प्रलंबित असलेल्या शैक्षणिक समस्या सोडवा, शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण तूर्त स्थगित करा, वरिष्ठ व निवड श्रेणी पात्र शिक्षकांना विनाअट मंजूर करा, तसेच कडक उन्हाळा सुरू झाल्यामुळे माध्यमिक शाळा सकाळ पाळीत घेण्याची परवानगी द्यावी आदी मागण्यांना घेऊन जिल्हा मुख्याध्यापक असोसिअएशनतर्फे शिक्षणाधिकारी माध्यमिक उल्हास नरड यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी विविध शैक्षणिक विषयांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्यामुळे माध्यमिकचे वर्ग सकाळी पाळीत घेण्याबाबत, तसेच शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण बंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी समस्या त्वरित निकाली काढण्याचे आश्वासन दिल्याचे मुख्याध्यापक असोसिएशनने सांगितले. यावेळी चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र बोबडे, सचिव राजू साखरकर, सल्लागार स्मिता ठाकरे, सहसचिव मनोज पावडे, सहकोषाध्यक्ष छाया मोहितकर, सदस्य अनिता पंधरे, रमा वाघमारे, हेमराज नदेश्वर, उमेश पंधरे आदींची यावेळी उपस्थिती होती.

Web Title: Solve secondary school problems