प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडविणार

By Admin | Updated: March 26, 2015 00:56 IST2015-03-26T00:56:42+5:302015-03-26T00:56:42+5:30

पंचायत समितीमधील शिक्षकांच्या प्रलंबित समस्या तात्काळ सोडवून शिक्षकांना न्याय देण्याची मागणी येथील संवर्ग विकास अधिकारी राजू आनंदपवार यांच्याकडे महाराष्ट्र राज्य प्राथमिक...

To solve the problems of primary teachers | प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडविणार

प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडविणार

चंद्रपूर: पंचायत समितीमधील शिक्षकांच्या प्रलंबित समस्या तात्काळ सोडवून शिक्षकांना न्याय देण्याची मागणी येथील संवर्ग विकास अधिकारी राजू आनंदपवार यांच्याकडे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने केली. या मागणीची तत्काळ दखल घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.
शिष्टमंडळात जिल्हा सरचिटणीस जे. डी. पोटे, तालुकाध्यक्ष दादा राऊत, कार्याध्यक्ष प्रशांत कंडे, उपाध्यक्ष नरेश बोमेवार, कोषाध्यक्ष प्रमोद बावीस्कर, अनिल नाट, विजय कार्लेकर आदी उपस्थित होते.
विशेष म्हणजे, आठ दिवसात समस्या निवारण सभा घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी दुय्यम सेवा पुस्तक अद्यायावत करणे, गोपनीय अहवालाची सत्यप्रत संबंधित शिक्षकांना देणे, बोर्डा, अजयपूर, केंद्राच्या वेतनाला वारंवार विलंब होतो. यावर निर्णय घेणे, उपस्थिती भत्याची रक्कम द्यावी, जात वैधता प्रमाणपत्राच्या नोंदी घ्याव्या, काही शाळेतील शिक्षकांचे प्रलंबित वेतन त्वरित काढावे, सन २०१४-१५ या सत्रातील गणवेशाची रक्कम द्यावी आदी मागण्यांचा समावेश आहे. शिष्टमंडळाने यानंतर येथील गटशिक्षणाधिकारी संध्या दिकोंडावार यांनाही निवेदन दिले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: To solve the problems of primary teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.