वाढीव वीजबिलाविरोधात सामाजिक संघटना एकवटल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:00 IST2020-06-27T05:00:00+5:302020-06-27T05:00:28+5:30
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने सुरु केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक, मजूर, किरकोड व्यापारी यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे वीज वितरण विभागाने पाठविलेले वारेमाप बिल भरणे जनसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे वीज बिल माफ करण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उर्जामंत्री यांना पाठवलेल्या निवेदनातून नगरसेविका कल्पना इंदुरकर यांनी केली.

वाढीव वीजबिलाविरोधात सामाजिक संघटना एकवटल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लॉकडाऊन कालावधीतील तीन महिन्यांचे विद्युत बिल माफ करावे, अशी मागणी विविध सामाजिक संघटनेकडून करण्यात येत आहे. अनेक सामाजिक संघटनांनी याबाबतचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.
धर्मनिरपेक्ष लोकशाही आघाडी
चंद्रपूर : महावितरण कंपनीने वितरीत केलेले लॉकडाऊन कालावधीतील तीन महिन्यांचे एकत्रित वीजबिल भरणे जनसामान्यांना अडचणींचे जात आहे. त्यामुळे वीज बिल माफ करण्याची मागणी धर्मनिरपेक्ष लोकशाही संघटनेतर्फे बाबुपेठ येथील मुख्य अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
यावेळी प्रा. नामदेव कन्नाके, वामन बुटले, मंगेश बदखल, अंकुश वाघमारे, इंदुताई डोंगरे, वर्षा लाटेकर, सुविधा बांबुळे, याकुब पुल्ला, कोमुरय्या चीराप आदी उपस्थित होते.
गोंडपिपरीत भाजपचे निवेदन
आक्सापूर : लॉकडाऊनमुळे जनसामान्यांना येत असलेल्या अडचणीमुळे थकित वीज बिल माफ करावे, तसेच पुनर्गगठन केलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे अशी मागणी भारतीय जनता पाटीतर्फे करण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष बबन निकोडे, माजी नगराध्यक्ष संजय झाडे, निलेश संगमवार उपस्थित होते.
चिमुरात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
चिमूर : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने सुरु केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक, मजूर, किरकोड व्यापारी यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे वीज वितरण विभागाने पाठविलेले वारेमाप बिल भरणे जनसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे वीज बिल माफ करण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उर्जामंत्री यांना पाठवलेल्या निवेदनातून नगरसेविका कल्पना इंदुरकर यांनी केली. याप्रंसगी अनिता बोरकर, बिल्कीस शेख, वनिता सहारे, वनमाला सहारे, शोभा भगत आदी उपस्थित होते.
अभियंत्याला निवेदन
घुग्घुस : लॉकडाऊनमुळे अनेक छोटे-मोठे उद्योग, व्यापार व रोजगार बुडाला. परिणामी आर्थिक अडचणीमुळे बिल भरणे शक्य नसल्याने वीज बिल माफ करावे, अशी मागणी येथील सहायक अभियंत्यांना म. रा. सु. रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेना व शिवसेना महिला आघाडीच्या वतीने दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष किशोर बोबडे, तालुका प्रमुख सुमेश रंगारी, शहर प्रमुख परिवर्तन कुम्मरवार, सहसचिव विठ्ठल अतकरे, हिरालाल शहा, शिवसेना महिला आघाडी संगीता बोबडे, नीता मुक्के, नीता श्रीवास्त, उज्वला मडावी, आशा काळे, शिला धोबे आदी उपस्थित होते.