शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

सासु-सुनांच्या नात्याबद्दल दिला सामाजिक संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 22:26 IST

जन्माला येईल ते उत्तमच असत, त्याची जपणूक मात्र महत्त्वाची असते. त्यातल्या त्यात नाते तर जपलेच पाहिजे. पण दुर्दैवाने आज नात्यामध्ये दुरावा निर्माण होत आहे. संवेदना बोथट झाल्या आहेत.

ठळक मुद्देसासु-सासऱ्यांनी एकमेकांना भरविला सगुण घास : चिरादेवी येथे अनोखा लग्न सोहळा

सचिन सरपटवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : जन्माला येईल ते उत्तमच असत, त्याची जपणूक मात्र महत्त्वाची असते. त्यातल्या त्यात नाते तर जपलेच पाहिजे. पण दुर्दैवाने आज नात्यामध्ये दुरावा निर्माण होत आहे. संवेदना बोथट झाल्या आहेत. कुटुंबामधील सासु-सुनांच ‘सख्य’ तर सर्वश्रृत आहे. परंतु, सुनांनी घडवून आणलेल्या सासु-सासºयांच्या लग्न सोहळ्याने एक अनोखा अनुभव चिरादेवी वासीयांना अनुभवायला मिळाला. सासु-सुनांच नात कस असाव, हा सामाजिक संदेश या लग्न सोहळ्यातून देण्यात आला. लग्नाप्रसंगी सासु-सासºयांनी एकमेकांना भरवलेल्या सगुण घासाचा प्रसंग तर खरच आनंददायी ठरला. सोबतच नात्यांची सुंदरता समोर आली.भद्रावती तालुक्यातील चिरादेवी येथील हनुमान ठाकरे (६८) व रेवता हनुमान ठाकरे (६०) यांच्या लग्नाचा ४५ वा वाढदिवस साजरा करण्याचे कुटुंबाने ठरवले. या कार्याची जबाबदारी त्यांच्या दोन सुनांनी घेतली. त्याला त्यांच्या दोन मुलींचेही सहकार्य लाभले. हयात असताना सासु-सासºयांना आनंद द्यावा, या भावनेतून लग्नाच्या वाढदिवशी त्यांचे पुन्हा लग्न लावायचे ठरले. रितीरिवाज, रूढी, परंपरेनुसार हा अनोखा लग्नसोहळा पार पडला. यामधून सासु-सासºयांच्या प्रती सुनांचे असलेले आदर व प्रेम व्यक्त झाले.लग्नाचे सर्व सोपस्कार करण्यात आले. आदल्या दिवशी मेहंदीचा तर दुसºया दिवशी हळदीचा कार्यक्रम पार पडला. वधु-वरांना बाशिंग बांधण्यात आले. वराला हनुमान मंदिरापर्यंत नेवून परिसरातून मिरवणूक सुद्धा काढण्यात आली. लग्न सोहळ्यात मंगलाष्टके झालीत. हळदीच्या वेळेस वर-वधूच्या मागे नातू व नातीला त्यांचे आईवडील म्हणून बसविण्यात आले. दुप्पटा ेनातवांनी पकडला. संपूर्ण चिरादेवी गावाला जेवणाच आमंत्रण देण्यात आले होते. जयश्री वासुदेव ठाकरे व लक्ष्मी मोहन ठाकरे या दोन्ही सुनांनी सासु-सासºयांच्या या लग्न सोहळ्याची संकल्पना पुढे आणली. मंदा श्रीकृष्ण वरखडे व रंजना दिलीप सूर या ठाकरे कुटुंबियांच्या मुलींनी या कार्याला सहकार्य केले.या लग्नसोहळ्याची माहिती आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत नव्हती. आमच्या सुना व मुलींनी हा आगळावेगळा सोहळा घडवून आणला. आमच्या सुना म्हणजे आमच्या मुलीच आहे. सासु-सुनांच नात प्रत्येक कुटुंबात असच राहो, हीच आमची अपेक्षा आहे.- हनुमान ठाकरे, रेवता ठाकरेरा. चिरादेवी