सोशल डिस्टंन्सिंगचे वाजताहेत तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 05:00 AM2020-04-06T05:00:00+5:302020-04-06T05:00:35+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. बाहेरून येणाऱ्यांना तसेच जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे. तरीही जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये चोरीछुपे येणाºयांचे प्रमाण अद्यापह कमी झालेले नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने आता कडक उपाय योजनास सुरूवात केली आहे.

Social distancing not followed | सोशल डिस्टंन्सिंगचे वाजताहेत तीनतेरा

सोशल डिस्टंन्सिंगचे वाजताहेत तीनतेरा

Next
ठळक मुद्देब्रह्मपुरीतील भाजी मंडईत प्रचंड गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : देशात कोरोनाचे रूग्ण वाढत असतानाही अनेकांना याच गांर्भीय नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. लॉकडाऊ न असतानाही दुचाकीवरून पोलिसांचा नजर चुकवत अनेकजण दररोज खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. भाजी विक्रीची ठिकाणे, मासेविक्रीची ठिकाणे व किराणा दुकानांमध्येही शहरात आणि गावांमध्येही गर्दी होताना दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने सोशल डिस्टन्स ठेवण्याच्या केलेल्या अवाहनाचे तीनतेरा वाजताना दिसत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. बाहेरून येणाऱ्यांना तसेच जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे. तरीही जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये चोरीछुपे येणाऱ्यांचे प्रमाण अद्यापह कमी झालेले नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने आता कडक उपाय योजनास सुरूवात केली आहे. तरीही नागरिकांकडून या उपाययोजनांना पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याने सर्वजण हतबल झाले आहेत.
शहरातील बाजारात काही मच्छीविक्रेते, मासे विक्रीसाठी आनण्यात आले होते. बाजारात मासे खरेदीसाठी ग्राहकांची रिघ लागली. यावेळी सोशल डिस्टन्स राखले गेलेले नाही. हे उघडपणे दिसून येत होते. त्याचबरोबर कोरोनाचे संकट गंभीर वळणार असतानाही अनेकांनी मास्क किंवा साधे रूमालही तोंडाला बांधलेले नसल्याचे दिसून आले.
मागील दोन ते तीन दिवसांपासून बाजारपेठेतही गर्दी दिसून येत आहे. किराणामाल खरेदीसाठी व अन्य अवश्यक वस्तूसाठी बाजारपेठेत जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

ुब्रह्मपुरीतील भाजी मंडईत प्रचंड गर्दी
ब्रह्मपुरी : रविवारी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात भाजी विक्रेत्यांनी गर्दी केली होती. तर ग्राहकांनीसुद्धा सोशल डिस्टन्सिंगचे उल्लघन करीत खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पोलीस प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते जीवापाड प्रयत्न करीत आहेत. परंतु, नागरिकांना यांचे गांभीर्य दिसून येत नसून ते बाजारपेठेमध्ये गर्दी करीत आहेत. भाजीविक्रेते दररोज घरी भाजीविक्री करण्यासाठी येत असताना अनेकजण बाहेर पडून खरेदी करीत आहेत. त्यामुळे संचारबंदीचे उल्लघन होत आहे.

Web Title: Social distancing not followed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.