विसापुरात शिवजयंतीनिमित्त समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:52 IST2021-02-21T04:52:29+5:302021-02-21T04:52:29+5:30

विसापूर : येथील छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक विकास मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंती साजरी करण्यात आली. ...

Social awareness program on the occasion of Shiva Jayanti in Visapur | विसापुरात शिवजयंतीनिमित्त समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम

विसापुरात शिवजयंतीनिमित्त समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम

विसापूर : येथील छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक विकास मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह गावातील महापुरुषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सायंकाळी शिवचरित्रावर व्याख्यानमाला व सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रावणी कोडेलवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जि.प. प्रा. शाळा विसापूर(वस्ती)च्या वर्षा जीवने तर प्रमुख वक्ते म्हणून चिंतामणी विद्यालयाचे मुन्नालाल पुंडे, प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक रामदास हरणे, विष्णू धुर्वे, ऋषी नगराळे, ग्रामपंचायत सदस्य सुनील रोंगे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मंडळाच्या अध्यक्ष मंजुळा कन्नाके, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष किरणकुमार पुणेकर, जि. प. प्राथमिक शाळेच्या शिक्षिका पंचशीला पाटील उपस्थित होते. बीपीएड कॉलेज विसापूरचे संस्थापक दिलीप जयस्वाल, अ भा. गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष मारोतराव गावंडे, लक्ष्मी मॅरेथॉन स्पोर्टिंग क्लबचे प्रशिक्षक प्रमोद पुणेकर, सर्पमित्र विलास भोयर, माजी सैनिक पत्नी ताराबाई उद्धव वाढई यांचा सत्कार करण्यात आला. यंकाळी संघपाल महाराज वर्धा यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सूत्रसंचालन श्रद्धा साखरकर व संदीप पोडे यांनी केले. तर क्रांतीकुमार भोजेकर यांनी आभार मानले. आयोजन मंडळाचे अध्यक्ष मयूर नागापुरे, उपाध्यक्ष सौरभ गिरसावळे, सचिव चेतन भोयर, सहसचिव प्रीतम पाटणकर, कोषाध्यक्ष योगेश निपुंगे, सहकोषाध्यक्ष राहुल ताजने व मंडळाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Social awareness program on the occasion of Shiva Jayanti in Visapur